चिनी वस्तूवर बहिष्कार टाका
By admin | Published: October 29, 2016 12:51 AM2016-10-29T00:51:24+5:302016-10-29T00:51:24+5:30
चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे.
रघुवीर अहीर : कमल स्पोर्र्टींग कल्बचे आंदोलन
चंद्रपूर : चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे. पाकिस्तानला शस्त्र, अस्त्र उपलब्ध करुन देत असल्यामुळे आपल्या जवानाचा नाहक बळी जात आहे. मात्र आर्थिक बाजूने चीनच्या उत्पादीत वस्तूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करीत आहोत. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे आपणाला चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, असे वक्तव्य कमल स्पोर्र्टींग कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी केले.
चिनी वस्तूच्या बहिष्कार आंदोलनालनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी ते बोलत होते.
कमल स्पोर्र्टींग कल्ब व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गिरणार चौकातून गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कमल स्पोर्र्टींग कल्बचे मार्गदर्शक शिवम त्रिवेदी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रघूवीर अहीर म्हणाले, आज आपण प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व वस्तंूसाठी चिनी वस्तूचा वापर करीत आहोत. त्या वस्तूचा वापर करणे टाळावे व चिनी वस्तूवर बहीष्कार टाकावा, असे आवाहन केले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष सुरज पेंदूलवार म्हणाले, चीन भारताच्या विरोधी पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानसोबत प्रत्यक्ष व चीनसोबत अप्रत्यक्ष लढाई करावी लागत आहे. चीनचे सामर्थ्य त्यांच्या व्यापारावर अवंलबून आहे. त्यामूळे चिनी वस्तूवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे ते म्हणाले. यावेळी मोहन चौधरी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर, सुरज पेंदूलवार, राहूल गायकवाड, हिमायू अली, प्रज्वल कडू, शिवम त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल कडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव लिंगोजवार, जगदीश दंडेले, तेजा सिंग, महेश अहीर, कमल कालीवाले, रवी बनकर, हेमराज काबलिया, जितू शर्मा, मयूर झाडे, विपीन मेंढे, अक्षय खांडेकर, जितेश वासेकर आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)