‘बेदाणा, हळदीला जीएसटीमधून वगळा’
By admin | Published: June 8, 2017 04:26 AM2017-06-08T04:26:28+5:302017-06-08T04:26:28+5:30
वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाणा आणि हळदीचा समावेश करण्यात आला आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/सांगली : वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाणा आणि हळदीचा समावेश करण्यात आला आहे. याचा फटका राज्यातल्या बेदाणा आणि हळद उत्पादकांना बसणार आहे. यामुळे हळद आणि बेदाण्याला ‘जीएसटी’मधून वगळण्यात यावे, अशी मागणी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्राद्वारे केली आहे. खोत यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केला आहे. याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी खोत यांच्याकडे केली होती.