बहिष्कृतांना आता धमक्या

By admin | Published: October 29, 2015 01:05 AM2015-10-29T01:05:32+5:302015-10-29T01:05:32+5:30

जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून सिंदेवाही तालुक्यात आंबोलीतील तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. आता गावकऱ्यांकडून या बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांना धमक्या दिल्या जात

Exclusions now threaten | बहिष्कृतांना आता धमक्या

बहिष्कृतांना आता धमक्या

Next

संतोष कुंडकर, चंद्रपूर
जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून सिंदेवाही तालुक्यात आंबोलीतील तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. आता गावकऱ्यांकडून या बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांना धमक्या दिल्या जात असून, महिनाभरापासून प्रचंड मन:स्ताप सहन करीत असलेल्या एका कुटुंबातील तरुण घरातून पळून गेला आहे. गावकऱ्यांच्या भीतिपोटीच गाव सोडल्याचा आरोप त्याच्या पित्याने केला आहे.
गावकऱ्यांनी बहिष्कृत केलेल्या गोकुलदास धुसाजी मेश्राम, आनंद लहानु नन्नावरे, व इंद्रजित ऋषीजी गावतुरे यांनी मंगळवारी दुपारी या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात गावकऱ्यांविरुद्ध रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश परघने यांनी बहिष्कार टाकणाऱ्या काही गावकऱ्यांना सायंकाळी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. थेट कायदेशीर कारवाई न करता गावकऱ्यांचे प्रबोधन केले जावे, यातून मार्ग काढावा, अशी भूमिका पाथोडे यांनी मांडली. गावकरीही बहिष्कार मागे घेण्यास तयार झाले. मात्र, बुधवारी गावकऱ्यांकडून धमक्या मिळू लागल्याने, तीनही बहिष्कृत कुटुंबे अधिकच दहशतीखाली वावरत आहेत.

Web Title: Exclusions now threaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.