कॅमेऱ्यात टिपला अनोखा सौंदर्याविष्कार!

By admin | Published: March 19, 2017 03:40 AM2017-03-19T03:40:34+5:302017-03-19T03:40:34+5:30

वरळीच्या लोढा सुप्रिमस येथील ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित रचना दर्डा यांच्या छायाचित्रण प्रदर्शनाला दाद देण्यासाठी शनिवारी सायंकाळी कलारसिकांनी एकच गर्दी केली.

Exclusive beauty in the camera! | कॅमेऱ्यात टिपला अनोखा सौंदर्याविष्कार!

कॅमेऱ्यात टिपला अनोखा सौंदर्याविष्कार!

Next

मुंबई : वरळीच्या लोढा सुप्रिमस येथील ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित रचना दर्डा यांच्या छायाचित्रण प्रदर्शनाला दाद देण्यासाठी शनिवारी सायंकाळी कलारसिकांनी एकच गर्दी केली. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकमत’ समूहाचे एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. तर याप्रसंगी ‘लोकमत’ समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा आणि त्यांच्या पत्नी आशू दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळा पार पडला.
महाराष्ट्रासह जगभरातील विविध वास्तूंचे सौंदर्य, स्थापत्यशास्त्र, प्रकाशाची किमया आणि देखणा निसर्ग आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्रकार रचना दर्डा यांनी अस्खलितपणे टिपला आहे. प्रवासादरम्यान जगभरातील पर्यटनस्थळांचा अनोळखी कोपरा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून एका वेगळ्या सौंदर्याविष्काराची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांमध्ये दिसणारे वास्तुसौंदर्य, परंपरा आणि लोककला यांचे भाव कलारसिकांना भावणारे आहेत. कॅलिफोर्निया, दक्षिण आफ्रिका, केनिया, फ्रान्स, कॅनडा, काश्मीर, लंडन, हैदराबाद, राजस्थान अशा विविध ठिकाणांचे वेगळेपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला श्रीराम मिलचे मालक विकास कासलीवाल, एमको कंपनीचे अध्यक्ष राजेश जैन, एमको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश जैन, ‘लोकमत कॉर्पोरेट’चे अध्यक्ष अरुण गेरा, कांतिलाल कोठारी, पूर्वा कोठारी, सुनीत कोठारी, अर्पिता अग्रवाल, रुचिरा दर्डा, रमेश अग्रवाल, रिखव शाह, अश्मी शाह, श्याम भंडारी, नितीन गांधी, टिना गांधी, डॉ. सागर शाह, डॉ. रेश्मा शाह, मीनाक्षी जैन, विकास नारायणन, तृप्ती नारायणन, अर्चना शेठ, रिषभ शेठ आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)

Web Title: Exclusive beauty in the camera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.