EXCLUSIVE : विद्यापीठात पहिल्यांदाच स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम
By admin | Published: July 18, 2016 07:25 PM2016-07-18T19:25:13+5:302016-07-18T19:38:53+5:30
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्सिट्यूटमध्ये पहिल्यांदाच पूर्णवेळ स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्सिट्यूटमध्ये पहिल्यांदाच पूर्णवेळ स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल इन्सिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट(IISM)च्या सहकार्याने गरवारे इन्सिट्यूटमध्ये आता स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून विद्यार्थांना व्यावसायिक शिक्षण घेता येणार आहे. तसेच, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये पदवी आणि मास्टरची डिग्री संपादन करता येणार आहे.
स्पोर्ट्स मॅनेजमेंट एज्युकेशनसाठी भारतात इंटरनॅशनल इन्सिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) अग्रेसर आहे. आगामी काळात भक्कम शैक्षणिक अनुभव, उद्योगांशी संबंध आणि संशोधन आधारित अभ्यासक्रम पुढील विकासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंट आगामी करिअरचा पर्याय असेल.