Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 05:57 PM2021-08-31T17:57:02+5:302021-08-31T18:00:06+5:30

ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले.

Exclusive: “It is time to say 'Hindu Khatre Mein Hai'; Nitesh Rane Target Uddhav Thackeray | Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”

Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली तर भाजपासाठी सोप्प जाईल. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली

मुंबई - मातोश्री, वर्षामध्ये जे महायज्ञ असतात ते कशासाठी आहेत? सरकार ५ वर्ष चालणार असं म्हणता मग काळी जादू, बुवाबाजी कशाला करता?, पैसे, भ्रष्टाचार, बदल्यांसाठी, वसुलीवरुन या तिन्ही पक्षांमध्येच भांडणं आहे. हिंदुत्व बस्तानात टाकलं आहे. केवळ हिरवे कपडे घालणंच बाकी आहे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आमदार नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले की, हिंदु सण, हिंदु मंदिरं नको अशी परिस्थिती राज्यात ठाकरे सरकारने केलीय. महाराष्ट्रात हिंदु खतरे मे है असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईतला हिंदु कसा संपेल असा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीकडून चालवला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. मालवणीत हिंदुंना अक्षरश: पळवलं जातंय. हिंदु मुलींना टार्गेट केलं जातंय. सेक्युलरच्या नावाखाली शिवसेनेने बाळासाहेबांचे हिंदुत्व बाजूला सारलंय. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले.

"राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट

तसेच नारायण राणे(Narayan Rane) यांचा अनुभव आहे. मुंबईच्या राजकारणाबद्दल त्यांना प्रचंड अनुभव आहे. हा नेता आशिष शेलार, लोढा यांच्या सगळ्यांसोबत उभा राहिला. तर गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली तर भाजपासाठी सोप्प जाईल. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली आहे. मग प्रचारात दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील असं नितेश राणे यांनी सांगितले.  

राणे कुटुंबासाठी तो भावनिक क्षण

नारायण राणेंसोबत जो प्रवास आईनं बघितला आहे. चढउतार बघितले आहेत त्यामुळे आईकडून खूप काही शिकायला मिळतं. काही विषय आई इतक्या सहजपणे आम्हाला सांगते, आईला ज्या गोष्टी राजकारणाबद्दल कळतात आम्हाला आश्चर्य वाटतं. आमच्या घरावर जो हल्ला करण्यात आला तो राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण होता. जर तुम्हाला यायचं होतं तर तारीख सांगून यायचं होतं. आम्ही नसताना तिथे आला. परंतु आमचे कार्यकर्ते आमच्या घराचं संरक्षण करण्यात समर्थ होते. आमच्या घरात लहान मुलं होतं. जो काही धिंगाणा घातला ही मानसिकता ठाकरे कुटुंबाने दाखवली त्याचा आईला त्रास झाला असं नितेश राणे म्हणाले.

‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक

तसेच आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.  

Web Title: Exclusive: “It is time to say 'Hindu Khatre Mein Hai'; Nitesh Rane Target Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.