Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 13:47 IST2019-03-20T19:13:00+5:302019-03-30T13:47:47+5:30
भाजपची घोडदौड सुरु असताना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्या ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या.

Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण
मुंबई : 2014 मध्ये आमच्याबाबत संभ्रम आणि चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली, असे स्पष्टीकरण देताना त्यांनी राणे समर्थकांनी केलेल्या चुकांवरही गंभीर भाष्य केले. आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या चुका आमच्यावर लादल्या गेल्या. त्यांनी चुका केल्या त्याचा राग राणेंवर काढू, या भावनेतून 2014 मध्ये अपयश आले, अशी कबुली नितेश राणे यांनी दिली.
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली.
भाजपची घोडदौड सुरु असताना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्या ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या. यामुळे लोकसभा, विधानसभेनंतर जनतेला कळून चुकले की राणेंशिवाय पर्याय नाही. राणे कोणताही निर्णय घेतात त्यावर चर्चा होते. ते जो निर्णय घेतात तो आमच्या हिताचा असतो, यामुळे मतभेद होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मतांचा आदर नेहमी करतो, असेही त्यांनी सांगितले.
नारायण राणेंना सहकारी सोडून गेले, शंकर कांबळी, संदेश पारकर. यामुळे ते कधी एकटे पडत असल्याचे कधी जाणवले का असे विचारले असता राणेंनी त्यांची जबाबदारी पार पाडली. ही मंडळी आज कुठे आहेत? काही लोक कणकवली नगरपंचायतची निवडणूकही जिंकू शकले नाहीत. यामुळे ही लोक कुठे आहेत आणि राणे कुठे आहेत, याचा विचार व्हायला हवा, असा टोला त्यांनी शंकर कांबळी, संदेश पारकर यांचे नाव न घेता लगावला.
तसेच देश महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. आपल्या देशातील तरुणाईची संख्या जपान, चीनच्या तुलनेत जास्त आहे आणि वाढत जाईल. त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याकडे ही निवडणूक जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. आमच्यासाठी राजकीय दृष्टीकोणातून आणि राज्याच्या राजकारणात आमची जागा काय असेल हे दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगितले.
नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा
Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'