Exclusive : उरण दहशतवाद प्रकरणी विद्यार्थ्यांची दोन तास चौकशी
By admin | Published: September 23, 2016 06:09 PM2016-09-23T18:09:49+5:302016-09-23T18:09:49+5:30
उरणच्या बोरी परिसरात अतिरेकी शिरल्याच्या दोन विद्यार्थ्यांच्या माहितीने नवी मुंबईसह मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल आज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर
Next
>- मनीषा म्हात्रे/ऑनलाइन लोकतम
मुंबई, दि. 23 : उरणच्या बोरी परिसरात अतिरेकी शिरल्याच्या दोन विद्यार्थ्यांच्या माहितीने नवी मुंबईसह मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल आज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज दोन्ही विद्याथ्यांकडे नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) पथकाने चौकशी केली. या चौकशीनंतर हा अहवाल सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
उरणमधील युईएस शाळेत शिकणारी विद्यार्थीनी गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास शाळकडे येण्यास निघाली. तेव्हा तिने या अतिरेक्यांना पाहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती शिराळे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, शाळेकडे येत असताना, नौदलापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बोरी परिसरातील मंदिराजवळ असलेला गेट उघडा दिसल्यामुळे या विद्यार्थीनीचे लक्ष त्याकडे वेधले गेले. मुळात येथे असलेला गेट कोस्टल विभागाला जोडला गेला आहे. तो नेहमी बंद असतो. तिने उत्सुकतेने पुढाकार घेतला तेव्हा, सर्कल करुन उभ्या असलेल्या पाच शस्त्रधारी तरुण तिच्या नजरेत पडले. काळ्या वेशातील पठाणी कपड्यांमध्ये असलेल्या या तरुणांच्या हातात बंदुक आणि पाठीवर सक होती. ती घाबरलेल्या अवस्थेत शाळेकडे आली. तिने शिक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलीला घेऊन माझ्याकडे आले. तिच्या माहितीनंतर सातच्या सुमारास आणखीन एका विद्याथ्याने एका शस्त्रधारी इसमाला पाहिल्याचे सांगितले.
भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उरणमध्ये आहे. शिवाय, नौदलाचे तळही उरणमधील मोराजवळ आहे. आॅईल अँड नॅचरल गॅसचं (ओएनजीसी) प्लांटही उरणमध्ये असून, जीटीपीएस -एमएसईबीचा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच आहे. यावेळी तरुणांच्या बोलण्यामध्ये पहेले ओनजीसी उडायेंगे उसके बाद स्कूल’ या संभाषणामुळे घाबरलेल्या या विद्यार्थीनी शाळेकडे धाव घेतली. झालेल्या प्रकार शाळेच्या शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शाळेने नौदलाकडून याची खातरजमा करुन याबाबत स्थानिक पोलिसांना याची माहिती दिल्याचे शिराळे यांनी दिली.
सतर्कता म्हणून गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. सुरक्षेच्या दुष्टीने शुक्रवारी उरणमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उरण गावात १२ शाळा आहेत. त्या शाळा बंद ठेवत त्याठिकाणी एनएसजीची एक तुकडी तळ ठोकून आहे. तर शस्त्रधारी पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत हा अहवाल अतिरिक्त गहसचिव के.पी. बक्षी यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मुले खरे सांगताहेत का नाही हे पाहण्यासाठी त्यांनी दोन रेखाचित्र तयार केले आहेत. मात्र सकाळी साडे नऊच्या सुमारास या दोन्ही विद्यार्थ्यांकडे नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि एनएसजीचीच्या पथकाने उलट तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. मात्र विद्यार्थी आपल्या बोलण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल सायंकाळी पाच पर्यंत पोलीस महासंचालकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यांच्याकडून हा अहवाल पुढे के.पी बक्षी यांना देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे करणार ब्रेन वॉश...
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी दहशतीखाली आहेत. त्यामुळे त्यांचे ब्रेन वॉश करण्यात येणार असल्याचे युईएस शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती शिराळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.