एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ : शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Published: May 24, 2016 10:39 AM2016-05-24T10:39:03+5:302016-05-24T18:05:00+5:30

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर आंबोलीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

EXCLUSIVE VIDEOS: Military cremation grounds on Shaheed Gawad | एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ : शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ : शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Next
आनंद जाधव (सावंतवाडी)
आंबोली (जि.सिंधुदुर्ग), दि. २४ - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर आज आंबोली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सकाळी शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव गोव्यातून आंबोली येथे आणण्यात आले. महाराष्ट्राच्या या शूरपुत्राच्या सन्मानासाठी हजारो गावकरी उपस्थित असून या वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, बिगेडियर प्रविण शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी आंबोलीत दाखल झाले आहेत. 
श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील पांडुरंग महादेव गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. शनिवारी दहशतवाद्यांसोबत तब्बल नऊ तासांपर्यंत चकमक चालली. या चकमकीत भारतीय जवानांनी सर्व पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे गावडे व ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार हे जखमी झाले. उपचारावेळी गावडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

गावडे कुटुंबात सैनिकी परंपरा
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. देशभर सेवा बजावताना त्यांनी विविध क्षेत्रात चमक दाखविली. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ ऑपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. कुपवाडामध्ये अतिरेक्यांबरोबर सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीत जवानांनी घरात लपलेल्या पाचही अतिरेक्यांचा खातमा केला. मात्र अतिरेक्यांची गोळी वर्मी लागल्याने गावडे शहीद झाले.
गावडे कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच आहेत. त्यापैकी गणपत हे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत. शहीद पांडुरंग फेबु्रवारीमध्ये एका महिन्याच्या रजेवर आले होते. यावेळी त्यांनी मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर धाकट्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. हा त्यांच्या कुटुंबासाठी अखेरचा क्षण ठरला.
 
 

Web Title: EXCLUSIVE VIDEOS: Military cremation grounds on Shaheed Gawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.