पोटच्या मुलीचा खून करणाऱ्याला फाशी

By Admin | Published: April 17, 2016 02:37 AM2016-04-17T02:37:04+5:302016-04-17T02:37:04+5:30

चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश

The execution of the boy's daughter's murder is hanging | पोटच्या मुलीचा खून करणाऱ्याला फाशी

पोटच्या मुलीचा खून करणाऱ्याला फाशी

googlenewsNext

अहमदनगर : चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत द. कुलकर्णी यांनी शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयातील गेल्या पाच वर्षांतील तिसरी तर दोन महिन्यांतील ही दुसरी फाशीची शिक्षा ठरली आहे.
घटनेच्या दिवशी म्हणजे १ मे २०१५ रोजीच्या मध्यरात्री मयत अल्पवयीन मुलगी गुलअब्सा, तिची दुसरी बहीण नर्गिस, मुलगा, सून, आई आणि वडील असे चौघे घरात झोपले होते. त्यापैकी मयत मुलगी घरातील एका स्वतंत्र खोलीत झोपली होती. घटनेच्या रात्री मयत मुलगी एक वाजता घरातून निघून गेली आणि रात्री २.३० वाजता घरात परत आली. सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या वेळी आलेल्या आवाजाने मुलीची आई धावत-पळत खोलीत गेली. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने काहीही न ऐकता तिला मारहाण करीत व गळा आवळून तिचा खून केला. यावेळी आरोपीसह सर्वच घरात होते. त्यानंतर आरोपी पळून गेला. अज्ञाताने राहुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर आईच्या जबाबावरून पोलिसांनी तिच्या बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुनील अंबादास आहेर यांनी फिर्याद दाखल केली. श्रीमती आर. एस. चव्हाण यांनी तपास करून २१ जून २०१५ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या नियमित सुनावणीला ६ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल डी. सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले. पुरावा व भक्कम युक्तिवादाच्या आधारे आरोपीस फाशीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)

श्रीमती आर. एस. चव्हाण यांनी तपास करून २१ जून २०१५ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या नियमित सुनावणीला ६ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल डी. सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले.

Web Title: The execution of the boy's daughter's murder is hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.