कुष्ठरुग्ण, क्षयरुग्णांना एसटीत सवलत
By Admin | Published: July 29, 2015 02:07 AM2015-07-29T02:07:11+5:302015-07-29T02:07:11+5:30
राज्यातील कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्णांना एसटीच्या भाड्यात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदापासून प्रथमच क्षयरुग्णांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
कोल्हापूर : राज्यातील कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्णांना एसटीच्या भाड्यात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदापासून प्रथमच क्षयरुग्णांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील ४१०० क्षयरोगी आणि ११,७०० कुष्ठरुग्णांना फायदा मिळणार आहे. अनुक्रमे ५० टक्के आणि ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे, असे साहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक यांनी सांगितले.