व्यायाम करा अन् आनंदी रहा

By admin | Published: May 23, 2015 12:39 AM2015-05-23T00:39:56+5:302015-05-23T00:39:56+5:30

दिवसभर कामाच्या ठिकाणी ताजेतवाने राहायचे असेल तर रोज व्यायाम करा. मी दररोज चालते, सायकलिंग करते, जिमला जाते, असे विविध व्यायाम करते.

Exercise and be joyful | व्यायाम करा अन् आनंदी रहा

व्यायाम करा अन् आनंदी रहा

Next

पुणे : दिवसभर कामाच्या ठिकाणी ताजेतवाने राहायचे असेल तर रोज व्यायाम करा. मी दररोज चालते, सायकलिंग करते, जिमला जाते, असे विविध व्यायाम करते. त्याचबरोबर नेहमी आनंदी राहते. त्यामुळे कितीही तास मी शूटिंगच्या कामात व्यस्त असले तरी मी ताजीतवानी राहते. तुम्हीही दररोज व्यायाम करा आणि आनंदी राहा, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘लोकमत सखी मंच’च्या सखींना दिला.
‘लोकमत सखी मंच’ आणि ‘चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट’ यांच्या वतीने ‘सुदृढ आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनाली कुलकर्णी उपस्थित होती. या वेळी तिने उपस्थित महिलांशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन, चिफ मेडिकल डायरेक्टर एम. के. मंडल, नगरसेविका पुष्पा कनोजिया, उद्योजक दिलीप वेडे-पाटील आदी उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मला फिट राहायला आवडते. त्यासाठी मी खूप प्रयत्न करते. बाळंतपणाच्या काळात मी माझा पूर्ण वेळ माझ्या बाळाला दिला. तेव्हा मात्र फिटनेसकडे लक्ष दिले नाही. बाळंतपणाचा आनंद घेतला. तो काळ मी जगले. त्यागावर माझा विश्वास नाही.’’
‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाबाबत सोनाली म्हणाली, ‘‘हा चित्रपट स्पर्शावर आधारित आहे. प्रत्येकाच्या जीवनात स्पर्शाला महत्त्व असते. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांचा स्पर्श हा खूप पवित्र असतो. आमच्या क्षेत्रात लुक्सला महत्त्व असते. त्यामुळेच मी फिटनेसला अधिक महत्त्व देते. या चित्रपटात मी साकारलेली भूमिका खूप वेगळी आहे. या चित्रपटाची कथा सुंदर आहे.’’
मधुमेहतज्ज्ञ डॉ. अंजली भट आणि डॉ. वेदवती पुरंदरे यांनी मधुमेहाबद्दल माहिती दिली. मधुमेह टाळण्यासाठी कसा आहार
घ्यावा, याबाबत त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Exercise and be joyful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.