आतबट्ट्याचा हंगाम, मका, मूग, सोयाबीन, उडदाचा एकरी खर्च निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:34 PM2018-06-17T23:34:36+5:302018-06-17T23:34:41+5:30
पावसाचे आगमन झाले की, शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू होते. पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीपासून सुरू झालेला प्रवास शेतमाल बाजारात पोहोचल्यानंतर थांबतो.
- भागवत हिरेकर
औरंगाबाद : पावसाचे आगमन झाले की, शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू होते. पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीपासून सुरू झालेला प्रवास शेतमाल बाजारात पोहोचल्यानंतर थांबतो. त्यामुळे खरिपात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या खर्चाचा ताळेबंद शेतकरीही तयार करतो. यापैकीच मका, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या प्रति एकरी सरासरी खर्चावर टाकलेला दृष्टीक्षेप.
मका : शेतकºयाची निकड भागवणारे आणि कमी वेळेत पैसा देणारे पीक म्हणून मका ओळखले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस मक्याचे क्षेत्र वाढत आहे. यासाठी एकरी खर्च बराच होतो. मका लागवड करायच्या जमिनीत अगोदर कपाशी असेल, तर नांगरणी आणि रोटा फिरविणे, यामुळे मशागतीच्या खर्च वाढतो.
सोयाबीन : हे तेलबिया पिकांपैकी एक आहे. चांगले उत्पादन आणि बाजारभाव असल्याने या पिकाकडे शेतकºयांचा कल वाढत आहे. सोयाबीनच्या पूर्वमशागतीवर सरासरी २ हजार रुपये खर्च होतो. त्यानंतर, विद्यापीठाकडील बियाणे घेतल्यास २,०८० रुपये लागतात. त्यानंतर, लागवडीवर (पेरणी, मजुरी, खतासह) ३ हजार रुपये खर्च होतो.
मूग आणि उडीद : ही दोन्ही डाळ पिके, तसेच यांच्या पाचोळ्यामुळे जमिनीचा पोतही टिकून राहतो. या दोन्ही पिकांवर शेतकºयांना फारसा खर्च करावा लागत नाही. मूळात शेतकरी हे आंतरपीक म्हणून घेतात. रब्बीतील पिकावर पूर्वमशागतीचा खर्च अवलंबून असतो.
या पिकांच्या वाहतुकीचा खर्च मालाचे ठिकाण ते बाजारपेठ आणि वाहतुकीचे दर यावरच ठरतो.
>मका
खर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)
मशागत २ हजार
पेरणी (मजुरीसह) २ हजार
बियाणे १ हजार ५०० रूपये
खते २ हजार
तण नियंत्रण १,५००
कीड नियंत्रण १ हजार
काढणी ४ हजार
मळणी २ हजार
उत्पादन २५ क्विंटल
एकूण खर्च १६ हजार
बाजारभाव ११,०० ते १२,००
प्रति क्विंटल
सोयाबीन
खर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)
मशागत २ हजार
पेरणी
(खत,मजुरीसह) ३ हजार
बियाणे २ हजार ८० रूपये
तण नियंत्रण १ हजार ५०० रूपये
कीड नियंत्रण २ हजार
काढणी, मळणी ३ हजार
उत्पादन ६ क्विंटल
एकूण खर्च १३,५८०
बाजारभाव ३,२०० रूपये
मूग आणि उडीद
खर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)
मशागत २ हजार
पेरणी (मजुरीसह) २ हजार
बियाणे ७५० रूपये
खते २ हजार
तण नियंत्रण १ हजार ५०० रूपये
कीड नियंत्रण १ हजार ५०० रूपये
काढणी, मळणी १ हजार
उत्पादन ४ ते ४.५ क्विंटल
एकूण खर्च १०,७५०
बाजारभाव ३,५०० ते ४ हजार प्रति क्विंटल
>शेतकºयांनी खर्चात बचत होण्यासाठी कृषी विद्यापीठाचे सुधारित वाण वापरून स्वत: बियाणे तयार करावे. एकरी २६ किलो बियाणे पुरेसे असून, हे पीक घेताना धोके टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पक्षी थांबे करावेत. बदलत्या वातावरणामुळे पावसात खंड पडतो. दोन पाळ्यांची पिकाला गरज निर्माण होते. संरक्षित पाण्याचे साठे शेतकºयांनी अगोदर तयार केले पाहिजेत. जमिनीतील आर्द्रता टिकविण्यासाठी सोयाबीनची पेरणी रुंद सरी वरंबा पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरेल.
-डॉ. एस.पी. मेहत्रे,
प्रभारी अधिकारी अखिल भारतीय सोयाबीन संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
>बहुतांश शेतकरी मुगाची आंतरपीक म्हणूनच लागवड करतात. हे पीक कमी कालवधीमध्ये येते. त्यामुळे जूनअखेरपर्यंतच शेतकºयांनी मुगाची पेरणी करणे फायदेशीर ठरेल. काढणीच्या काळातच पिकाला पावसामुळे धोका निर्माण होतो. कारण सतत दोन-तीन दिवस पाऊस राहिला, तर मुगाला कोंब येऊ लागतात. याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागतो.
- डॉ. जगदीश जहागीरदार,
प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर
भारतीय हवामान खात्याने यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तविले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली सलग चार वर्षे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांचे उत्पादन आणि खर्चात ताळमेळ न बसल्याने, कोरडवाहू शेती करणाºया शेकडो शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.महाराष्टÑात आत्महत्या केलेल्या शेतकºयांची आर्थिक आणि भौगोलिक आकडेवारी पाहिली, तर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर अशी खरिपाची पिके घेणाºया शेतकºयांची संख्या अधिक असल्याचे दिसून येईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अर्थशास्त्र बिघडल्यामुळे या भागात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन आणि तुरीची यंदा हमीभावाने खरेदी करण्यात राज्य सरकारने चालढकल केल्यामुळे व्यापाºयांनी शेतकºयांच अक्षरश: लूट केली.