‘एक्झिट पोल’वर १२ मे पर्यंतच बंदी
By admin | Published: May 10, 2014 01:29 AM2014-05-10T01:29:46+5:302014-05-10T01:29:46+5:30
अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : मतदानोत्तर जनमत चाचण्यांवर (एक्झिट पोल) निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत बंदी राहणार असल्याचे शुक्रवारी दुपारी जाहीर करणार्या केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने तासाभरातच खुलासा करीत अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले. मात्र, आयोगाने खुलासा जारी करेपर्यंत एक्झिट पोलबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेरच्या नवव्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी होणार आहे. मतदान संपल्यानंतर केवळ अर्धा तासापर्यंत एक्झिट पोल जारी करण्यावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एक्झिट पोलवर असलेली बंदी १२ मे रोजी साडेसहानंतर उठवली जाणार असल्याचे आयोगाचे संचालक धीरेंद्र ओझा यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी १६ मे पूर्वी एक्झिट पोलचे प्रसारण करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर आयोगाने तातडीने संभ्रम दूर केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काय म्हणाले होते ब्रह्मा ?
च्मतमोजणीच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत ‘एक्झिट पोल’ जारी करता येणार नाही. च्एक्झिट पोलची एवढी काय घाई आहे? १६ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर तुम्ही प्रसारण करा. १२ ते १६ मे मधील अंतर केवळ १५० तासांचे आहे. च्काही ठिकाणी फेरनिवडणूक होऊ शकते. १३ किंवा १४ मे रोजी फेरमतदान होणार नाही, याची हमी कोण देणार ?