Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:29 PM2024-11-20T19:29:51+5:302024-11-20T19:31:25+5:30
Exit Poll of Maharashtra 2024 : या पोल मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रातील एकूण 288 जागांसाठी आज (बुधवार) मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अर्थात बहुमतासाठी एकूण 145 जागा आवश्यक आहेत. तत्पूर्वी आता, राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर, एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यातच नुकताच 'इलेक्ट्रोल एज'चा पोल समोर आला आहे. यात भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुतीला किती जागा मिळणार? -
महाराष्ट्र विधानसभेसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर, 'इलेक्ट्रोल एज'चा हा पोल आला आहे. यात महायुतीतीलभाजपा 78 जागांसह सर्वात मोठा पक्ष अथवा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर येताना दिसत असला तर महायुतीला मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. महायुतीच्या हातातून राज्यातील सरकार जाताना दिसत आहे. महायुतीतील भाजपच्या 78 जागांशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) 26 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 14 जागा, अशा एकूण 118 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 145 जागांची आवश्यकता आहे. अर्थात या मॅजिक आकड्यापासून महायुतीला दूर राहताना दिसत आहे.
महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? -
'इलेक्ट्रोल एज'च्या पोलनुसार, काँग्रेस 60 जागांसह राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष तर महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. याशिवाय, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला 46 जागा तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागा मिळताना दिसत आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडीला एकूण 150 एवढ्या जागा मिळताना दिसत आहे अर्था महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा अंदाज या एक्झिट पोप मधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, इतरांना 20 जागा मिळण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे. राज्यातील चित्र असेल असेल असे नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आणि त्यानंतर झालेल्या हरियाणा विधानसभेच्या मतदानानंतर आलेले एक्झिट पोलचे आकडे पूर्णपणे आपटले होते अर्थात चुकीचे ठरले होते.