एक्झिट पोल म्हणतात अब की बार मोदी सरकार

By Admin | Published: May 12, 2014 06:26 PM2014-05-12T18:26:39+5:302014-05-12T20:05:48+5:30

एग्झिट पोलनुसार देशात आगामी सरकार हे भाजपाचे येणार व नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार आहेत असा अंदाज आहे.

Exit poll is now called the Modi government | एक्झिट पोल म्हणतात अब की बार मोदी सरकार

एक्झिट पोल म्हणतात अब की बार मोदी सरकार

googlenewsNext
ऑनलाइन टीम
 
नवी दिल्ली, दि. १२ - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच एग्झिट पोल यायला सुरूवात झाली असून एग्झिट पोलनुसार देशात आगामी सरकार हे भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे येणार व नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार आहेत असा अंदाज आहे. एनडीएला विविध एग्झिट पोलच्या अंदाजानुसार २४० ते ३०० जागा मिळतिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसची जागांची संख्या १००च्या आसपास राहणार असून अन्य दलांच्या एकत्रित जागा १५० ते २०० च्या घरात असतिल असा अंदाज आहे. यामुळे एनडीएचे सरकार निर्धोक येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतिल अशी शक्यता सध्यातरी दिसत आहे.
दरम्यान काँग्रेसने एग्झिट पोलनंतरच्या चर्चांमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवला असून भाजपाच्या प्रवक्त्यांनी एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या जागांपेक्षा जास्त जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला आहे.
सोमवारी मतदानाचा नववा व अंतिम टप्पा संपला. विविध एग्झिट पोल्सनी दर्शविलेल्या अंदाजानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे तर सत्ताधारी काँग्रेसला १०० च्या आसपासच राहावे लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
विविध एग्झिट पोल्सनी व्यक्त केलेले आघाड्यांचे संभाव्य बलाबल पुढीलप्रमाणे:

आजतक -  एनडीए - २९८, युपीए ९३, अन्य १५२

इंडिया न्यूज -  एनडीए ३१५, युपीए ८०, अन्य १४८

झी न्यूज -  एनडीए २९९, युपीए ११२, अन्य १३२

एबीपी न्यूज -  एनडीए २७८, युपीए ९३, अन्य १७२

इंडिया टीव्ही -  एनडीए ३१७, युपीए १०४, अन्य १२२

एनडीटीव्ही -  एनडीए २८३, युपीए ९९, अन्य १६१

टाईम्स नाऊ - एनडीए - २४९ , युपीए - १४८, अन्य १४६
 
विविध जनमत चाचण्यांचे निष्कर्ष थोडक्यात पुढीलप्रमाणे:
 
- एबीपी नेल्सनच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपाला २१ तर शिवसेनेला ११ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेसला ९, राष्ट्रवादीला ६ व आम आदमी पार्टीला १ जागा मिळेल असा अंदाज आहे.
 - आसाममध्ये भाजपाचा गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे आठ जागा मिळतिल असा अंदाज टाइम्स नाऊने व्यक्त केला.
- एबीपी न्यूज नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये ४६ जागा मिळतिल असा अंदाज आहे. काँग्रेसला आठ, बसपाला १३, सपा १२ तर अन्य एक असा अंदाज आहे.
- हरयाणा भाजपाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतिल, काँग्रेसच्या जागा कमी होतील तर आपला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज इंडिया टुडे समुहाच्या राहणीत व्यक्त करण्यात आला आहे.
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला ५ तर भाजपाला २ जागा मिळतिल असा अंदाज आहे. टीएमसीला २० तर डाव्या पक्षांना १५ जागा मिळतिल असा टाइम्स नाऊचा अंदाज आहे.
- ओरीसामध्ये नवीन पटनाईक यांचा करीश्मा कायम राहिला असून काँग्रेसला ५ तर भाजपाला अवघी १ जागा मिळेल असा अंदाज आहे.
- मेघालयात काँग्रेसला एक तर अन्य एक जागा मिळेल असा अंदाज आहे.
- सी व्होटरच्या अंदाजानुसार उत्तर भारतात एनडीएला १४१ तर युपीएला अवघ्या २५ जागा मिळतिल असा अंदाज आहे.
- पश्चिम भारतात एनडीएला ५६ तर युपीएला १९ ठिकाणी विजय मिळेल असा अंदाज सीव्होटरने व्यक्त केला आहे.
 - अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार एनडीएला २८७ तर युपीएला १०७ जागा मिळतिल असा अंदाज आहे. या अंदाजानुसार अन्य पक्षांना १२४ तर डाव्या पक्षांना  २५ जागा मिळतिल. विशेषत: भाजपाला २४२ व काँग्रेसला ९४ जागा मिळतिल असा अंदाज आहे.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार भाजपाला गुजरातमध्ये २६ पैकी २२ जागा मिळतिल तर काँग्रेसला चार जागा मिळतिल.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार हरयाणामध्ये भाजपाला ७ तर काँग्रेसला १ जागा मिळेल.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार झारखंडमध्ये भाजपाला १४ पैकी १२ जागा मिळतिल तर काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये भाजपाला १३ तर काँग्रेसला १४ जागा मिळतिल.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार भाजपाला २३ तर काँग्रेसला ३ जागा मिळतिल.
- अ‍ॅक्सिसएपीएमच्या अंदाजानुसार काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात महायुतीला ४८ पैकी ४१ जागा मिळतिल, काँग्रेसला अवघ्या ४ व राष्ट्रवादीला ३ जागा मिळतिल.
- रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला बिहारमध्ये २ जागा मिळतिल असा अंदाज आहे. 
- दिल्लीतील सर्वच्या सर्व ७ जागांवर भाजपाचा विजय होणार असल्याचा अंदाज सी व्होटरने दर्शवला आहे. 
- मध्यप्रदेशात भाजपाला २६ जागा मिळणार असून काँग्रेसला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज सी व्होटरने दर्शवला आहे.
- टाइम्स नाऊ ओआरजीच्या एग्झिटपोलनुसार सीमांध्रामध्ये भाजपा व टीडीपीला १७ जागा मिळतिल तर वायएसआर काँग्रेस पार्टीला ८ जागा मिळतिल असा अंदाज आहे.
- तर टाइम्स नाऊ ओआरजीच्या एग्झिटपोलनुसार तेलंगणामध्ये टीआरएसला ८ जागा मिळतिल तर भाजपा व तेलगू देसम पार्टीला दोन जागा मिळतिल असा अंदाज आहे.
- देशपातळीवर कर्नाटक, ओडिशासारख्या मोजक्या राज्यांचा अपवाद वगळता सपाटून मार खाणारी काँग्रेस तामिळनाडूमध्ये भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे.
- सीएनएन- आयबीएन सीएसडीएस लोकनितीच्या अंदाजानुसार जयललितांचा एआयएडीएमके २२ ते २८ जागांवर विजयी होईल, डीएमकेला ७ ते ११ जागा मिळतिल तर भाजपा-एमडीएमके युतीला चार ते सहा जागा मिळतिल. 

Web Title: Exit poll is now called the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.