एग्झिट पोल हा 'टाईमपास' - ओमर अब्दुल्ला
By admin | Published: May 13, 2014 04:03 PM2014-05-13T16:03:21+5:302014-05-13T16:03:21+5:30
लोकसभा निवडणुकांविषयी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केलेले एग्झिट पोल म्हणजे 'ग्रेट टाईमपास' असल्याचे जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन टीम
जम्मू कश्मिर, दि. १३ - लोकसभा निवडणुकांविषयी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केलेले एग्झिट पोल म्हणजे 'ग्रेट टाईमपास' असल्याचे जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
सोमवारी लोकसभा निवडणुकांचा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडताच विविध वृत्तवाहिन्यांनी आपले एग्झिट पोल दाखवायला सुरूवात केली आहे. आगामी लोकसभेत एनडीएचे सरकार येणार असून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज अनेक एग्झिट पोलने वर्तविला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज जवळपास सर्वच एग्झिट पोलने वर्तविला आहे. यावर आक्षेप घेत ओमर अब्दुल्ला यांनी एग्झिट पोलचा अंदाज चुकणार असल्याचे म्हटले आहे. एग्झिट पोल म्हणजे ग्रेट टाईमपास असून केवळ दोन सर्वे केल्यानंतर एखाद्या पक्षाचा विजय होतो असे म्हणने चुकीचे असल्याचे ओमर म्हणाले.