सत्तेतून बाहेर पडा!

By Admin | Published: March 15, 2015 01:24 AM2015-03-15T01:24:48+5:302015-03-15T01:24:48+5:30

सत्तेत सहभागी असूनही धोरणे तयार करताना घटकपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडा,

Exit the power! | सत्तेतून बाहेर पडा!

सत्तेतून बाहेर पडा!

googlenewsNext

पुणे : सत्तेत सहभागी असूनही धोरणे तयार करताना घटकपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडा, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पुण्यात घेतली. कोथरुडमध्ये संघटनेचे संयुक्त राज्य कार्यकारिणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनाही कार्यकर्त्यांनी यावेळी बोलू दिले नाही.
उद्घाटन सत्रात ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. या टीकेला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने सभागृहाचे वातावरण तापले होते.
त्यांनतर बोलण्यासाठी उभे राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी, कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्यापूर्वी संयम बाळगा, असे आवाहन करताच कार्यकर्ते संतापले. सत्तेतून बाहेर पडा, अशी जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी जानकर यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडले. (प्रतिनिधी)

रविवारी या शिबिराचा समारोप होणार असून कार्यकर्त्यांची नाराजी ध्यानी घेऊन संघटनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा ठराव करण्याची अथवा भाजपा विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता स्वाभिमानीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Exit the power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.