मीरा-भाईंदरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार - मुख्यमंत्री

By admin | Published: March 29, 2017 09:02 PM2017-03-29T21:02:56+5:302017-03-29T21:02:56+5:30

मुंबई मेट्रोचा विस्तार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

Expansion of Metro to Meera-Bhayander - Chief Minister | मीरा-भाईंदरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार - मुख्यमंत्री

मीरा-भाईंदरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार - मुख्यमंत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29-  मुंबई मेट्रोचा विस्तार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज विधानसभेत त्यांनी ही घोषणा केली. 
 
‘मेट्रो 9’ म्हणजे अंधेरी- दहिसर मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या 13 किलोमीटरच्या मार्गावर 10 मेट्रो स्थानकं असतील. यासाठी एकूण 6 हजार 518 कोटींचा खर्च येणार आहे. काही दिवसांमध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचं बोललं जात आहे.
 
याशिवाय, 23 हजार 136 कोटींचं ‘जायका’ कंपनीकडून कर्ज घेऊन कुलाबा – सीप्झ मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार आहे. 2020 पर्यंत या मार्गावर मेट्रो सुरू होईल.
 

Web Title: Expansion of Metro to Meera-Bhayander - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.