7 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
By admin | Published: July 4, 2016 08:14 PM2016-07-04T20:14:09+5:302016-07-04T20:14:09+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लागलीच राज्याच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लागलीच राज्याच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे. 7 जुलैला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, भाजप 4, सेना 2, मित्र पक्षांमधल्या तिघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. अनेक दिवसांपासून हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत होता. अखेर 7 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, आमदार गुलाबराव पाटील आणि नीलम गो-हेंची नावं चर्चेत आहेत. तर भाजपकडून हरिभाऊ जावळेंना संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळात भाजपकडून नव्या चेह-यांनाही संधी देण्यात येणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेकडून काहीशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. कोणत्याही मंत्रिपदासाठी शिवसेना लाचारी पत्करणार नसल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेत समाधानकारक वाटा न मिळाल्यामुळे शिवसेनेने वारंवार सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य करुन आपली खदखद व्यक्त केली आहे.