सोलापूर रेल्वे कार्यालय आवारात दारुच्या बाटल्याच्या खच
By admin | Published: September 23, 2016 08:35 PM2016-09-23T20:35:03+5:302016-09-23T20:35:03+5:30
१७ ते २५ सप्टेंबर हा सप्ताह मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने ‘स्वच्छता सप्ताह’ म्हणून पाळत असल्याची वल्गना केली जात आहे. दुसरीकडे डीआरएम कार्यालयाच्या
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - १७ ते २५ सप्टेंबर हा सप्ताह मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने ‘स्वच्छता सप्ताह’ म्हणून पाळत असल्याची वल्गना केली जात आहे. दुसरीकडे डीआरएम कार्यालयाच्या आवारातच अनेक ठिकाणी कोप-याला कचरा आणि दारुच्या बाटल्या आढळल्या. इतकेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाºयांनी घाईघाईने पत्रकार परिषद उरकण्याची परंपरा यावेळीही पाळली.
शुक्रवारी दुपारी विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांनी १७ ते २५ सप्टेंबरदरम्यान पाळण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेसंदर्भात माहिती दिली. येत्या काळात ४ लाख वृक्ष लावण्याची मोहीम मध्य रेल्वे सोलापूर विभागाने हाती घेतली आहे. रेल्वेच्या ४० हजार एकरावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या सप्ताहात ५३ गाड्यांमधून प्रवाशांशी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले. तसेच या डब्यांमधून तिकीट तपासणी मोहीम राबविली़ या मोहिमेत सापडलेल्या २५० फुकट्यांवर कारवाई करुन ५१,५०० रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय पेंट्रीकार आणि स्थानकावरील दुकानांतील खाद्यांची तपासणी केली़ तीन ठिकाणांच्या दुकानांतून पाण्याचे नमुने तपासणीला घेण्यात आल्याची माहिती दुबे यांनी दिली. सप्ताहभरात केंद्रीय विद्यालय आणि इतर संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विद्यार्थ्यांना आणि स्वच्छता मोहिमेत योगदान देणा-या रेल्वे कर्मचा-यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला़
घाईघाईने पत्रकार परिषद उरकण्याची परंपरा पाळली
विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे हे नियुक्त झाल्यानंतर दर महिन्याला एकदा पत्रकारांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते़ महिनाभरातील विकासकामे, विविध समस्यांवर चर्चा याविषयी संवाद साधण्याचे आश्वासन त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिले होते़ मात्र आजपर्यंत अनेकदा पत्रकार परिषदा, विविध विषयांवर बैठका झाल्या़ परंतु बहुतांश वेळा केवळ दहा मिनिटात परिषद आटोपून कार्यालयात जाणे पसंद केले़ याहीवेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रश्नावर संवाद साधला नाही़ त्यामुळे प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
‘डंपिंग झोन’चे सादरीक रण
वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या प्रियांक जैन आणि सुयश जैन या दोन विद्यार्थ्यांनी कचरा निर्मूलनावर ‘डंपिंग झोन’चे सादरीकरण केले़ रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणावर आढळणा-या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चहाचे कागदी कप, प्लास्टिक कप ही समस्या रेल्वेसाठी डोकेदुखी आहे़ विघटन आणि अविघटन अशा वस्तूंच्या निर्मूलनार्थ तुळजापूर रोडवर महापालिकेने उभारलेल्या यंत्रणेची माहिती या दोन विद्यार्थ्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून सादर केली. भविष्यात मध्य रेल्वे सोलापूर विभाग अशी यंत्रणा उभारण्याबाबत विचाराधीन आहे़ त्याअनुषंगाने आजचे हे सादरीकरण होते.
सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात आहे़ या मोहिमेत कार्यालयाच्या आवारात कचरा आढळणे अयोग्य आहे़ तसेच काही अवैध घटना घडत असतील तर त्यावर प्रशासनाचे लक्ष राहील़ ज्या ठिकाणी दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत त्या ठिकाणी आरपीएफ पोलीस कर्मचारी तैनात करू़ अशा घटना घडणार नाहीत, याबाबतही दक्षता घेऊ़
- आर. के़. शर्मा
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे सोलापूर विभाग