lokmat.com वर अनुभवा 'सत्तासंघर्ष'

By admin | Published: September 22, 2014 12:00 PM2014-09-22T12:00:18+5:302014-09-22T12:00:27+5:30

केवळ यंदाच्याच नाही तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी lokmat.com नं सुरू केला आहे 'सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक २०१४'

Experience the 'power struggle' at lokmat.com | lokmat.com वर अनुभवा 'सत्तासंघर्ष'

lokmat.com वर अनुभवा 'सत्तासंघर्ष'

Next
>ऑनलाइन लोकमत
विधानसभेचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या माध्यमातून रंगणारा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. सत्तेसाठीच्या या संघर्षात कोण बाजी मारतं हे अवघ्या महिन्याभरात स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांची जागावाटपावरून सुरू असलेली रुसवाफुगवी, स्वबळावर लढण्याची खुमखुमी या गोष्टी एकीकडे सुरू असतानाच सर्व पक्ष आता कंबर कसून मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रातील नंबर एकचे दैनिक असणारे 'लोकमत'ही या सत्तासंघर्षाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोचवण्यास सज्ज झाले आहे. केवळ यंदाच्याच नाही तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी lokmat.com नं सुरू केला आहे 'सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक २०१४' हा विशेष विभाग. काय आहे या विभागात:
 
- १९६२ सालच्या पहिल्या निवडणुकीपासून ते २००९ च्या मागच्या निवडणुकांचे निकाल.
- आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांचा मतदारसंघनिहाय आढावा.
- या सगळ्या म्हणजे ११ निवडणुकांमध्ये झालेली सगळ्या पक्षांची कामगिरी.
- आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची संक्षिप्त ओळख...हे सगळं आहे  सुटसुटित अशा टेबल फॉर्ममध्ये.
-  तसेच मतदार यादीत तुमचं नाव शोधता यावं याची सोयही आम्ही निवडणूक आयोगाच्या केली आहे. 
या शिवाय आपल्या सोबत असतील, गेल्या पन्नास वर्षांचा राजकीय पट उलगडणारे स्लाईडशोज, विविध घडामोडींवर तुम्हाला तुमचं मत मांडायचा हक्क देणारे पोल, दिवसभरातल्या ताज्या घडामोडी अव्याहतपणे तुमच्यापर्यंत पोचवणार्‍या लाईव्ह न्यूज आणि या रणधुमाळीचा साद्यंत वृत्तांत देणारा निवडणूक विशेष हा विभाग.चला तर मग  ‘सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक २0१४’ च्या माध्यमातून तयार व्हा निवडणुकीचा थरार अनुभवायला. 
 

Web Title: Experience the 'power struggle' at lokmat.com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.