एस विभागात अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांची होणार टक्कर

By admin | Published: January 31, 2017 03:32 PM2017-01-31T15:32:53+5:302017-01-31T15:32:53+5:30

मुलगी, बहिणी, पत्नी तर कुठे नात असे काहीसे चित्र यंदा भांडुपमधल्या महिला राजमध्ये पहावयास मिळत आहे. एस विभातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक

Experienced and newcomers to compete in S division | एस विभागात अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांची होणार टक्कर

एस विभागात अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांची होणार टक्कर

Next

लोकमत टीम

मुंबई : मुलगी, बहिणी, पत्नी तर कुठे नात असे काहीसे चित्र यंदा भांडुपमधल्या महिला राजमध्ये पहावयास मिळत आहे. एस विभातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक, नेते मंडळींनी आपल्या कुटुंबियातील महिलांना पुढे करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच पक्षांतर्गतच हेवेदावे सुरु झाले आहे. अशात रुसव्या फुगव्यातून कुठे मैत्री तुटली तर कुठे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एस वॉर्डातील यंदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे. यातूनच अनुभवी चेहऱ्यांना आव्हान देत काहीसे नवे चेहरे यंदाच्या निवडणूकीसाठी सज्ज झाल्याने यात तरुणाईचा अनोखा रंग मिसळताना दिसत आहे.
मागील निवडणूकीत भांडुप एस विभाग अंतर्गत एकूण १३ प्रभाग होते. यंदा एक प्रभाग वाढवून एकूण १४ प्रभागांची रचना केलेली आहे. मागील निरडणूकीत एस विभागात मनसे पक्षाला लोकांनी भरभरुन मतदान केल्याने त्यांचे एकूण ५ नगरसेवक निवडून आले होते. कॉग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तसेच शिवसेनेचे चार व एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. अपक्ष उमेदवार मंगेश पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपाने येथे खाते खोलले आहे. मात्र यंदा भांडुपमध्ये महिलांना अधिक प्राधान्य दिल्याने नवा प्रभाग क्र. ११४, ११५ व १२० हे खुले प्रभाग असल्याने सर्वचं राजकिय पक्षाचे दिग्गज पुरुष उमेदवार उपरोक्त तीन खुल्या प्रभागात मतदारांची चाचपणी करीत आहेत. अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येथेही महिला उमेदवार धावपळ करत असल्याने त्यांच्या उमेदवारांच्या रागात भर पडताना दिसली. त्यात महिला राजमुळे अनेक पक्षांतील नेतेमंडळींना हव्या तशा महिला उमेदवारही मिळत नसल्याचे चित्रही येथे पहावयास मिळत आहे.
भांडुपमधील काही प्रभागांमध्ये अनुभवी महिला उमेदवारांना टक्कर देण्यासाठी तरुणीही रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे एरवी काकू, ताई म्हणत मागे फिरणारी आपल्यासमोर उभी राहत असल्याने अंतर्गत धुसफूसही वाढली आहे. भांडुपमध्ये ऐतिहासिक असलेल्या शिवाजी तलावाच्या मुद्यावर उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे याच्या श्रेयीकरणावरुन पक्षां- पक्षांत वादही उफाळले आहेत. या भागांमध्ये भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजपला पडलेल्या मतदानाचा अभ्यास करुन, त्यांनी प्रत्येक प्रभाग भाजप बहुल कसा बनेल याचा विचार केला आहे. या अनुषंगाने मागील निवडणूकीतील तीन प्रभागांना विभागून एक प्रभाग नव्याने बनविला यामध्ये सुमारे १५ ते २० हजार भाजपप्रणित मतदारांना कॉम्पेक्ट केलेले दिसत आहेत.
त्यामुळे या निवडणूकीदरम्यान अटीतटीचा सामना पहावयास मिळणार आहे. एस विभातील कोकणी मतदारांनाही आपलेसे करण्यासाठी भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे. तर पक्षांतर्गत चर्चेत राहण्यासाठी मिळेत तो मुद्दा घेत उमेदवार सज्ज झाले आहेत.
.............

प्रभाग क्रमांक - १०९
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या
एकूण- ५६,९०६
अनुसूचित जाती - ३५९०
अनुसूचित जमाती -९४९
व्याप्ती - तुळशेतपाडा, तानाजीवाडी, टेंबीपाडा. भांडूप-तानसा पाईपलाईन
........................
प्रभाग क्रमांक - ११०
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५२,०३५
अनुसूचित जाती - १८७८
अनुसूचित जमाती - २८३
व्याप्ती - राजीव गांधी नगर, एमएमआरडीए कॉलनी, सुभाषनगर, भांडूप सोनापूर
....................
प्रभाग क्रमांक - १११
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५८३६६
अनुसूचित जाती - ४४१७
अनुसूचित जमाती - १३७०
व्याप्ती - किर्तीनगर, भवानीनगर, टाटानगर, शामनगरदातार कॉलनी, साईनगर , रुक्मिणी नगर
.....................
प्रभाग क्रमांक - ११२
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५१२७३
अनुसूचित जाती - ३०६९
अनुसूचित जमाती - ५३१
व्याप्ती - निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाब कॉलनी, राम नगर, दिना बामा ईस्टेट, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी
......................
प्रभाग क्रमांक - ११३
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५१२५२
अनुसूचित जाती - ३४९९
अनुसूचित जमाती - ७३३
व्याप्ती - मिलिंद नगर, गांव देवी भांडूप (पश्चिम विभाग)
सर्वोदय नगर, सेंट अँथोनी नगर, इंडस्ट्रीयल इस्टेट
......................
प्रभाग क्रमांक- ११४
आरक्षणखुला
लोकसंख्या
एकूण- ५०८३७
अनुसूचित जाती -२४२८
अनुसूचित जमाती -२७७
व्याप्ती - क्रांती नगर,आंनद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, सर्वेश्वर हॉस्पिटल,एस.वी.बी कॉलेड आॅफ कॉमर्स
................
प्रभाग क्रमांक - ११५
आरक्षणखुला
लोकसंख्या
एकूण- ४८३३६
अनुसूचित जाती - १९४२
अनुसूचित जमाती - ४३७
व्याप्ती - कोकण नगर, समर्थ नगर, जमील नगर,पठाण कॉलनी, उत्कर्ष नगर, महाराष्ट्र नगर
........................
प्रभाग क्रमांक - ११६
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५४७७६
अनुसूचित जाती - ५७८१
अनुसूचित जमाती - ५८१
व्याप्ती - हनूमान नगर, न्यू कॉलनी, महात्मा ज्योतिबा फुले नगर, हॉली ट्रीनिटी चर्च
....................
प्रभाग क्रमांक - ११७
आरक्षणइतर मागासवर्गीय (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५५३३१
अनुसूचित जाती - ४४५३
अनुसूचित जमाती - ५११
व्याप्ती - कांजूर व्हिलेज, ए़न.सी.एच. कॉलनी, इंद्रिरा नगर, मिराशी नगर
.....................
प्रभाग क्रमांक - ११८
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ५५९६६
अनुसूचित जाती - १००६८
अनुसूचित जमाती - ३६७
व्याप्ती - कन्नमवार नगर १ व २, टागोर नगर, हनुमान नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज आटर््स अ‍ॅन्ड कॉमर्स
......................
प्रभाग क्रमांक - ११९
आरक्षणइतर मागासवर्गीय (महिला)
लोकसंख्या
एकूण- ५९०३१
अनुसूचित जाती -५१६७
अनुसूचित जमाती - ३५९
व्याप्ती - भारत नगर, राजीव गांधी नगर,विक्रोळी विद्यालय, अशोक नगर,जय भवानी चाळ, काळाघोडा रामवाडी
......................



प्रभाग क्रमांक - १२०
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या
एकूण- ५५०८४
अनुसूचित जाती -४८५५
अनुसूचित जमाती - ४७४
व्याप्ती - सुर्या नगर, चंदन नगर, गोदरेड हिल साईड कॉलनी, लोकमान्य नगर, सिप्ला कंपनी
......................
प्रभाग क्रमांक - १२१
आरक्षणअनुसूचित जाती (महिला)
लोकसंख्या
एकूण- ४६१८६
अनुसूचित जाती -५५७६
अनुसूचित जमाती - २१९८
व्याप्ती - आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई लेक, मोरारजी नगर
......................
प्रभाग क्रमांक - १२२
आरक्षणइतर मागासवर्ग (महिला)
लोकसंख्या
एकूण- ४७७२६
अनुसूचित जाती -४०९०
अनुसूचित जमाती - ५३९
व्याप्ती - हिरानंदानी गार्डन , साईनाथ नगर, पंचकुटी गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर,
-----------------------------------------

२०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)

वॉर्ड क्र विजयी उमेदवारप्राप्त मते पराभूत उमेदवार प्राप्त मते
१०४सुरेश हरिश्चंद्र कोपरकर (काँग्रेस)८५९९राजाराम दिनकर गव्हाणे(मनसे)४६२०
१०५मंगेश नारायण पवार (अपक्ष)६९६५हरिनक्षी मोहन चैरथ (मनसे)६८०५
१०६रमेश गजानन कोरगावकर (शिवसेना)(९४८४)संतोष बी. चव्हाण (मनसे)५५९६
१०७अनिषा अमोल माजगावकर (मनसे)१०७०५संगीता नरेश पेडणेकर (शिवसेना)७३०५
१०८रुपेश वायंगणकर (मनसे) ९७८३राजेंद्र हरिषचंद्र मोकल(राष्ट्रवादी)८५९७
१०९वैष्णवी विजय सरफरे(मनसे) ८८९९ प्रमिला कमलाकर पाटील (अपक्ष) ६६४१
११०धनंजय सदाशिव पिसाळ (राष्ट्रवादी) ११७५३विनोद रामचंद्र शिंदे (मनसे) ९०३९
१११अशोक धर्मराज पाटील (शिवसेना) ६५५८रविंद्र नारायण कदम (मनसे)४७९२
११२प्रियांका सुर्यकांत श्रुगांरे (मनसे) ९०३५शोभा गौतम कदम (रिपाइं- ए) २३७९
११३तावजी सहदेव गोरुले (शिवसेना) ८९३६अब्दूल रेहमान अन्सारी(राष्ट्रवादी) ७००६
११४विश्वास तुकाराम शिंदे (शिवसेना) ७९०९प्रणिल विक्रम नायर ( काँग्रेस)५३१५
११५चंदन सितरंजन शर्मा (राष्ट्रवादी)६८९७ भवानीशंकर हरिश्चंद्र शर्मा (भाजप) ४५६३
११६अविनाश भास्कर सावंत (मनसे)३६६१अरविंद शंकर शिंदे (शिवसेना) ३३५७
.......................................................
(एन वॉर्ड)

११७डॉ. भारती सुबोध भावदाने (शिवसेना) ११३७७ दामिनी दत्तात्रय बसणकर (मनसे) ६४१६
११८हारुन युसूफ खान (राष्ट्रवादी) ९५६७ गणेश अर्जुन चुक्कल (मनसे) ४५०३
११९संजय भालेराव (मनसे) १०७६६सरस्वती गजानन भोसले(शिवसेना) ६६३०
१२०प्रतिक्षा राजू घुगे(राष्ट्रवादी)७८२० निर्मला सुभाष पवार (शिवसेना) ७०२५
१२१रितू राजेश तावडे (भाजप)७०६९भारती बाबूराव मोरे( मनसे) ५८०६
१२२ दिपकबाबा हांडे (अपक्ष) ८५५९ कोमल अलियास शिर्के साई नगरकर (शिवसेना)६५३८

Web Title: Experienced and newcomers to compete in S division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.