फिटनेस आणि रनिंगविषयी आज तज्ज्ञांचे मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:16 AM2020-08-01T05:16:07+5:302020-08-01T05:16:24+5:30
लोकमतचा उपक्रम : व्हर्च्युअल फ्रीडम रन विषयक वेबिनारचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण जगभरातच लॉकडाऊन लागू झाले आणि प्रत्येकाची जगण्याची पद्धतच बदलून गेली. या सर्व कठीण काळात आपल्या वाचकांची, त्यांच्या कुटुंबीयांची आणि एकंदरीतच समाजाची आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी लोकमत मीडियाने पुढाकार घेऊन लोकमत व्हर्च्युअल रनचे आयोजन केले आहे.
दि. १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. फेसबुकच्या महामॅरेथॉन पेजवर व्हर्च्युअल रनसंदर्भातच वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून, यादरम्यान फिटनेस तज्ज्ञ धावपटूंना मार्गदर्शन करतील. डॉ. संदीप काटे (संस्थापक, सातारा रनर्स फाऊंडेशन), विजेंद्र सिंग (ज्येष्ठ अॅथ्लेटिक्स, प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्राधिकरण), जागतिक मॅरेथॉन मेजर पूर्ण करणाऱ्या कविता रेड्डी व्हर्च्युअल रनचे महत्त्व सांगतील. रिलॅक्स झीलच्या फिटनेस तज्ज्ञ प्रीती भानुशाली या वेबिनारच्या समन्वयक असतील.फिटनेसविषयी जागरूक असणाºया प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.निरोगी जीवनशैलीसाठी जागरूकता
वाढविणे आणि कोविडविरोधी लढा देण्यासाठी लोकमत मीडिया आता सरसावला आहे.
दि. २ आॅगस्ट रोजी व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले असून, याअंतर्गत तुम्ही
३, ५ किंवा १० किलोमीटर धावू शकता. तुमची इच्छा असेल त्यावेळी आणि तुम्हाला पाहिजे त्याठिकाणी तुम्ही धावा आणि या उपक्रमात सहभागी व्हा.