एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी ४ जुलैनंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 04:53 AM2017-07-03T04:53:29+5:302017-07-03T04:53:29+5:30

मुंबई विद्यापीठातर्फे पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरीही अजून अनेक

Expiration of FAV entry starting after 4th | एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी ४ जुलैनंतर सुरू

एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी ४ जुलैनंतर सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरीही अजून अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ ऐंशीपर्यंतदेखील खाली आला नसल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले. यानुसार, विद्यापीठाकडून ४ जुलै रोजी आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीसाठीचे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तथापि, विद्यार्थ्यांनी उपलब्ध जागांचा विचार करून विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
एफवायच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. याआधी मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तीन याद्या जाहीर करण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ जुलैनंतर संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात येईल. संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. तर कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बारावीच्या निकालात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात यंदा वाढ झाली आहे.

प्रवेश अडचणीत
नामांकीत कॉलेजांच्या रांगेतील विद्यार्थ्यांनी आता इतर कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी पळापळ सुरू केली आहे. मात्र अनेकांनी त्या महाविद्यालयांतील प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी पूर्ण न केल्याने प्रवेश अडचणीत आले आहेत.

Web Title: Expiration of FAV entry starting after 4th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.