मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 07:36 AM2023-09-11T07:36:52+5:302023-09-11T07:37:21+5:30

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी शासनाला दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपासून (रविवार) पाणी, उपचार बंद केल्याचे अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. 

expired; Now no water, no treatment, thirteenth day of fasting; Manoj Jarange is firm | मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम

मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम

googlenewsNext

जालना - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी शासनाला दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपासून (रविवार) पाणी, उपचार बंद केल्याचे अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. 

२८ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. १ सप्टेंबर रोजी येथील उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला झाल्यानंतर प्रकरण चिघळले आहे. आजवर शासनस्तरावरून उपोषणकर्त्यांशी शिष्टमंडळामार्फत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. 

शासनाने काढलेल्या जीआरमध्ये बदल करत सरसकट मराठा  समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासह इतर मागण्या जरांगे  यांनी केल्या होत्या. शासनाने जीआरमध्ये काही बदल केले.  परंतु, ते बदलही अपेक्षित झाले नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. शासनाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे. 

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक
मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथिगृहात होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बोलावले आहे. 
आडकाठी आणू नये 
सर्वपक्षीयांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही यात आडकाठी करू नका. उद्या होणाऱ्या सर्वपक्षीयांच्या बैठकीपूर्वी रात्रभर गोरगरिबांच्या मुलांचे आयुष्य डोळ्यासमोर आणावे. सर्वपक्षीयांनी योग्य मार्ग काढावा, अशी साद उपोषणकर्ते जरांगे यांनी घातली.

Web Title: expired; Now no water, no treatment, thirteenth day of fasting; Manoj Jarange is firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.