व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहा कोटींची फसवणूक उघड

By admin | Published: October 12, 2016 06:38 AM2016-10-12T06:38:38+5:302016-10-12T06:38:38+5:30

व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७२ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड

Explain the fraud of six crores through Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहा कोटींची फसवणूक उघड

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहा कोटींची फसवणूक उघड

Next

जितेंंद्र कालेकर / ठाणे
व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७२ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनविलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात सांगितले.
कंपनीत महत्त्वाच्या पदावरील कर्मचाऱ्यांनी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनविला होता. त्याद्वारे किती परदेशी लोकांकडून किती डॉलर पैसे काढले, याच्या नोंदीही हस्तगत केलेल्या मोबाईलमधून सहायक पोलीस आयुक्त मुमूंद हातोटे, वरिष्ठ निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाला मिळाल्या आहेत. नवोज उर्फ कबीर वर्धन गुप्ता या व्यवस्थापकाच्या ग्रुपने दोन लाख १६ हजार ६६६ डॉलर (एक कोटी ४३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे स्पष्ट झाले. गोविंद ठाकूर आणि अंकित गुप्ता या व्यवस्थापकांकडून तीन लाख ४६ हजार ३९५ ची कॉल सेंटरची सामुग्री जप्त केली. त्यांनी दीड लाख डॉलर अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे उघड झाले. तर अर्जून वासूदेव या व्यवस्थापकाच्या चौकशीतूनही बरीच माहिती उघड झाली. त्याच्याकडून कॉलसेंटर कर्मचाऱ्यांच्या पगाराची ८५ हजार ३७० इतकी रोकड आणि काही उपकरणे जप्त केली. १० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर २०१६ या एक अवघ्या महिन्यांच्या कालावधीत त्याच्या टीमने एक लाख ७४ हजार ४०५ डॉलर (एक कोटी १५ लाख १० हजार ७३० रुपये) इतकी फसवणूक केली आहे.
जॉनसन डॉन्टीस या आयटी एक्सपर्टच्या ग्रुपमधून एक लाख ६५ हजार ४३९ डॉलरची (एक कोटी नऊ लाख १८ हजार ९७४ रुपये) फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. तर अविनाश आणि हिम्मत राजपूत यांच्या ग्रुपने एक लाख ८९ हजार ७२० डॉलर अर्थात एक कोटी २५ लाख २१ हजार रुपये अमेरिकन
नागरिकांकडून उकळले असून या सात जणांच्या चौकशीतून त्यांनी पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिले तीन मजले ‘रग्गड कमाई’चे
1मीरा रोड येथील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्क, बाले हाउस, युनिवर्सल आउट सोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाउस अशा तीन इमारतींमधील सात कॉल सेंटरवर पोलिसांनी धाडसत्र राबविले. त्यातील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्कच्या सातमजली इमारतीमध्ये कमाईप्रमाणे विभागणी केली होती.
2पहिल्या तीन मजल्यांवरील कथित कर्मचारी हे महिन्याला तीन ते पाच लाख डॉलर इतकी ‘कमाई’ कॉल सेंटरला करून देत होते. यामध्ये आयटी एक्सपर्टचा मोठा समावेश होता. तिकडून मिळालेले पैसे ते अहमदाबादला ट्रान्सफर करीत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगारही मोठ्या वेगाने वाढत होते. तर चार ते सहा मजल्यांवरून एक ते तीन लाख प्रति महिना डॉलर ‘कमाई’ करणारा कर्मचारी वर्ग तैनात केलेला होता.
3 शेवटच्या सातव्या मजल्यावर मात्र त्यांनी गिऱ्हाईकांना जाळ्यात कसे ओढायचे, अमेरिकन भाषेची लकब आणि कसब शिकविण्याचे प्रशिक्षण केंद्र उभारले होते. आता या टोळीने कोणाककडून आणि कसा स्वीकारला याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Explain the fraud of six crores through Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.