पीटरच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा

By admin | Published: June 28, 2016 04:07 AM2016-06-28T04:07:57+5:302016-06-28T04:07:57+5:30

पीटर मुखर्जी याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.

Explain the role on Peter's bail application | पीटरच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा

पीटरच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा

Next


मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.
न्या. रेवती मोहिते - डेरे यांनी सीबीआयला नोटीस बजावत, या जामीन अर्जावरील सुनावणी ७ जुलैपर्यंत तहकूब केली. सत्र न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
आपल्याविरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. त्यामुळे जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती पीटरने विशेष सीबीआय न्यायालयाकडे केली. मात्र, सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याचे विशेष न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास दोनदा नकार दिला.
तपास सुरू असल्याच्या आधारावर जामीन फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयावर पीटर मुखर्जीने प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘तपासयंत्रणेकडे ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्र दाखल केल्यानंतर पुढील तपास करण्यासाठी निश्चित कालावधी नसतो. तपास सुरू आहे, हे कारण एखाद्याला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवण्यासाठी योग्य नाही,’ असे पीटरच्या जामीन अर्जात म्हटले आहे.
गेल्या वर्षी श्यामवर रायला शस्त्र प्रकरणात अटक केल्यानंतर ही केस उजेडात आली. त्यानंतर, सीबीआयने इंद्राणी, खन्ना आणि श्यामवरला अटक केली. हत्येमागे आर्थिक धागेदोरे असल्याने, कटात पीटर सामील असल्याने, सीबीआयने नोव्हेंबरमध्ये पीटरलाही अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Explain the role on Peter's bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.