व्हायरल ऑडिओ क्लिपवर बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 03:45 PM2020-02-02T15:45:27+5:302020-02-02T15:46:22+5:30
हिरॉइन शब्दाचा अर्थ म्हणजे कर्तबगार महिला, असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर आपलं स्पष्टीकरण दिलंय.
मुंबई : शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे आक्षेपार्ह विधान भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप समोर आल्याने लोणीकर यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. तर याप्रकरणी बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले असून, तहसीलदारांना हिरॉइन शब्द आदरानं वापरला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हिरॉइन शब्दाचा अर्थ म्हणजे कर्तबगार महिला, असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर आपलं स्पष्टीकरण दिलंय. तहसीलदारांना हिरॉइन शब्दानं उच्चारलं याचा अर्थ कर्तबगार आणि चांगलं काम करणारी महिला आहे. यात वाईट हेतूने मी काहिही बोललेलो नाही. तर विरोधकांनी याचं भांडवल करू नये असेही लोणीकर म्हणाले.
शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान हवे असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मराठवाड्यातील परतूनहून निघाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी कार्यकर्ते जमवून आणले पाहिजेत. प्रसंगी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या हिरॉइन बोलावू, हिरॉइन नाही मिळाती तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले होते.