जिलेटीनचा स्फोटात दोन मजूर ठार
By admin | Published: April 27, 2016 08:31 PM2016-04-27T20:31:19+5:302016-04-27T20:31:19+5:30
विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिल्ह्यातील येवला तालुक्यात घटना घडली.
नाशिक - विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिल्ह्यातील येवला तालुक्यात घटना घडली.
येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील साहेबराव बकाजी शिंदे यांच्या विहीरीचे खोदकाम राजस्थानी कामगारांकडून सुरु होते. पाचू नंदाजी गुर्जर (४५) व महादू भिल (२५) हे दोन राजस्थानी कामगार विहिरीत उतरले. दगडाला पाडलेल्या छिद्रात जिलेटीन ठासत असतांना अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. पाचू गुर्जर यांचा मुलगा पारसमल गुर्जर हा जवळच स्वयंपाक करीत होता. स्फोटाचा आवाज ऐकल्यावर त्याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याला विहिरीत दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी या कामाचा ठेका घेणारा ठेकेदार देवीलाल गुर्जर भिलवाडा (राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. येवला तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.