दिवा स्थानकात प्रवासी संख्येचा ‘विस्फोट’

By admin | Published: April 8, 2017 03:22 AM2017-04-08T03:22:42+5:302017-04-08T03:22:42+5:30

अनधिकृत बांधकामे आणि आंदोलने यामुळे सतत चर्चेत राहिलेले दिवा आता पुन्हा चर्चेत आले आहे

'Explosion' of passenger number in Diva station | दिवा स्थानकात प्रवासी संख्येचा ‘विस्फोट’

दिवा स्थानकात प्रवासी संख्येचा ‘विस्फोट’

Next

सुशांत मोरे,
मुंबई- अनधिकृत बांधकामे आणि आंदोलने यामुळे सतत चर्चेत राहिलेले दिवा आता पुन्हा चर्चेत आले आहे. दिवा स्थानकातील प्रवासी संख्या वाढतच जात असून, २0१६-१७मध्ये दिवा स्थानकातून दर दिवशी अधिक १७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. २0१४-१५च्या तुलनेत ही लक्षणीय वाढ असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्यामुळे हे स्थानक मध्य रेल्वेच्या लिस्टमध्ये थेट दहाव्यावरून आठव्या स्थानावर आले आहे. डोंबिवली स्थानकाने प्रवासी संख्येत तीन वर्षे पहिले स्थान तर ठाणे स्थानकाने दुसरे स्थान पटकावले आहे. २0१६-१७मध्ये डोंबिवली स्थानकातून दर दिवशी २ लाख ४६ हजार १६१ प्रवासी प्रवास करतात. २0१४-१५मध्ये हाच आकडा २ लाख ३४ हजार १४0 एवढा होता. ठाणे स्थानकातही हीच परिस्थिती आहे. या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असलेल्या रहिवासी इमारती आणि व्यवसाय पाहता प्रवासी संख्या वाढत जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक खासगी, सरकारी कार्यालये वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथे जात असल्याने त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर होत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
२0१६-१७मध्ये मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय लोकलची प्रवासी संख्या १५२ कोटी एवढी झाली आहे. २0१५-१६मध्ये हाच आकडा १४६ कोटी होता. प्रवासी संख्येत जवळपास ३.८ टक्के वाढ झाली आहे.
स्थानक२0१४-१५२0१६-१७
डोंबिवली२,३४,१४0२,४६,१६१
ठाणे२,२७,८२६२,४३,४२३
घाटकोपर१,७८,४४७१,८५,९0१
कुर्ला१,५४,१२४१,५८,३३५
मुलुंड१,५0,000१,५२,२२८
सीएसटी१,६१,११३१,४१,३८७
भांडुप१,0३,३५७१,0६,६१९
दिवा७८,५८0९५,६९0
विक्रोळी९३,२६९९४,८७९
बदलापूर८0,६२१९१,0६७
शीव७५,0८0८३,0३७

Web Title: 'Explosion' of passenger number in Diva station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.