एसटीकडून भाडेवाढीचा ‘स्फोट’
By admin | Published: October 1, 2016 01:41 AM2016-10-01T01:41:09+5:302016-10-01T01:41:09+5:30
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्यात आली असून साध्या, निमआराम आणि शिवनेरीच्या भाड्यात १0 ते २0 टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय
Next
मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्यात आली असून साध्या, निमआराम आणि शिवनेरीच्या भाड्यात १0 ते २0 टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
२००६ साली गृह विभागाकडून एक अधिसूचना काढली होती. यात एसटी महामंडळास वर्षातील सर्व हंगामात केव्हाही ३३ टक्क्यांपर्यंत ज्यात वातानुकूलित बसही अंतर्भूत आहेत आणि इतर सेवांच्या बाबतीत १५ टक्क्यांपर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंत भाडे कमी करण्यास परवानगी दिली. याच निर्णयानुसार दिवाळीसाठी प्रवास भाड्यात १0 ते २0 टक्क्यांची भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)