४५ भाषांमध्ये फेसबुकवर व्यक्त व्हा!

By admin | Published: July 3, 2016 04:01 PM2016-07-03T16:01:10+5:302016-07-03T16:01:10+5:30

फेसबुकवर लवकरच ४५ भाषांमध्ये आपले मत व्यक्त करता येणार आहे. फेसबुक यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करीत आहे

Express in 45 languages ​​on Facebook! | ४५ भाषांमध्ये फेसबुकवर व्यक्त व्हा!

४५ भाषांमध्ये फेसबुकवर व्यक्त व्हा!

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ :  फेसबुक हे आपल्या रोजच्या वापरातील अविभाज्य घटक बनले आहे. फेसबुक आपण न चुकता रोज पाहतो. घरी, ऑफिसमध्ये तर कधी ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला फेसबुक वापरायचा मोह आवरत नाही. २००४ मध्ये लाँच झालेलं फेसबुक सुमारे दशकाहून जास्त काळ आपल्या संवाद साधनांवर अधिराज्य करत आहे. फेसबुक प्रमाणए अनेक सोशल साईट सध्या आहेत. त्या प्रतिस्पर्धीला टक्कर देण्यासाठी फेसबुकने एक नवीन शक्कल लढवली आहे. फेसबुकवर लवकरच ४५ भाषांमध्ये आपले मत व्यक्त करता येणार आहे. फेसबुक यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करीत आहे, ज्यामुळे तुम्ही टाकलेली पोस्ट विविध भाषांमध्ये भाषांतरीत करता येऊ शकेल.
 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही फेसबुकवर जी पोस्ट लिहाल, त्याला फेसबुकच्या ४५ भाषांत भाषांतरीत करण्याचा ऑप्शन दिला जाईल. ज्या भाषा तुम्ही निवडाल त्यामध्ये ती पोस्ट भाषांतरीत होऊन समोरच्या व्यक्तीला वाचण्यास उपलब्ध होईल. या ४५ भाषांच्या यादीत फ्रेंच भाषेपासून ते फिलिपीनो भाषेचा समावेश आहे. या नव्या फिचरची सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येत असून, ५००० यूजर्स याचा वापर करीत आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्यास हे फिचर फेसबुकच्या सर्व यूजर्सना उपलब्ध करून देण्यात येईल.
 
आणखी वाचा... 

 

फेसबुक वापरताना लक्षात ठेवण्याच्या ७ गोष्टी....

Web Title: Express in 45 languages ​​on Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.