एक्स्प्रेस वेवर बसची डम्परला धडक

By Admin | Published: September 23, 2015 01:37 AM2015-09-23T01:37:57+5:302015-09-23T01:37:57+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत

Express bus hit Dum Dum in the bus | एक्स्प्रेस वेवर बसची डम्परला धडक

एक्स्प्रेस वेवर बसची डम्परला धडक

googlenewsNext

खालापूर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेल्या रिकाम्या डम्परला तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची बस धडकून झालेल्या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर बस डम्परमध्ये अडकली होती. एक्स्प्रेस वेवर सुरक्षेचे नियमच पाळले जात नसल्याचे या अपघातानंतर समोर आले आहे.
तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची (एपी २९-२-३४२९) बस मुंबईतून तेलंगणातील मेहबूब नगर येथे जात होती. खालापूर टोलनाका पास केल्यानंतर खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेला डम्पर (एमएच ४६ एफ ०३३६), बस चालकाला न दिसल्याने भरधाव वेगातील बस डम्परला धडकली. या अपघातात बसचा चालक पद्मनाभन, कंडक्टर वेकंटय्या, अर्शद शेख, बाळासाहेब पाटील हे व ट्रकचा क्लीनर अतुल साहुबाव दाते हे किरकोळ जखमी झाले.
डम्परला धडकल्याने बसची डावी बाजू कापली गेली. सुदैवाने या अपघातातून मोठी जीवितहानी
टळली.
सोमवारी झालेल्या अपघातातही क्वॉलीस डम्परला जाऊन धडकली होती. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताची माहिती मिळताच खोपोलीचे पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे व महामार्ग विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.
एक्स्प्रेस वेवरील प्रवास धोकादायक असल्याचे मंगळवारी झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात वाहने धावत असताना उलट दिशेने डम्पर आलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अनेकदा ही वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. एक्स्प्रेस वेवर खाजगी प्रवासी बस व अन्य वाहने खुलेआम प्रवासी घेत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे.
यामुळे मोठ्या अपघाताची भीती असल्याने अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Express bus hit Dum Dum in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.