एक्स्प्रेस-वेवर पुन्हा दरड कोसळली
By admin | Published: August 2, 2015 03:45 AM2015-08-02T03:45:16+5:302015-08-02T03:45:16+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रस्ता वाहतुकीसाठी खुला होताच दुपारी पुन्हा खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ दरड
Next
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रस्ता वाहतुकीसाठी खुला होताच दुपारी पुन्हा खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. तासाभराच्या मदतकार्यानंतर दगड बाजूला करण्यात आला. मात्र, सुरक्षेच्या कारणासाठी मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बंद करून ती वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आली. लोणावळा, खंडाळा बोर घाटातून पुन्हा ती एक्स्प्रेस-वेला जोडण्यात आली.