एक्स्प्रेस-वे चौदा पदरी

By Admin | Published: February 6, 2015 01:28 AM2015-02-06T01:28:59+5:302015-02-06T01:28:59+5:30

सरकारने खालापूर टोलनाक्यापासून सहा पदरी असलेला हा रस्ता चौदा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Express-way fourteen | एक्स्प्रेस-वे चौदा पदरी

एक्स्प्रेस-वे चौदा पदरी

googlenewsNext

खालापूर : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्यापासून लोणावळ्यापर्यंत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी सरकारने खालापूर टोलनाक्यापासून सहा पदरी असलेला हा रस्ता चौदा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आर्थिक नाडी असणारा हा रस्ता चौदा पदरी झाल्यानंतर बोरघाटात होणारी वाहतूककोंडी टाळता येणार आहे. बोरघाटात ३९ किलोमीटरपासून सुमारे ८ कि.मी.चा बोगदा काढण्यात येणार आहे. शिवाय लोणावळा येथील भुशी डॅमच्या पाण्याखालून (१८० मीटर) हा रस्ता सिंहगड कॉलेजजवळ जोडला जाण्याची शक्यता आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. सहा पदरी असलेला या रस्त्यावर टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहने खालापूर टोलनाक्यापासून द्रुतगतीमार्गाने पुण्याकडे जातात. यामध्ये अवजड वाहने अधिक असल्याने वाहतूककोंडी तीव्र होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते. ही वाहतूककोंडीची समस्या कायमची दूर करायची असेल तर या मार्गावर लेनची संख्या वाढविण्याची गरज असल्याने खालापूर टोलनाक्यापासून हा महामार्ग चौदा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)

च्बोरघाटातून बोगदा काढून भुशी डॅमच्या १८० मीटर पाण्याखालून हा महामार्ग सिंहगड कॉलेजजवळ जोडला जाणार आहे. या सहा पदरी रस्त्यामुळे वाहतूककोंडी निकालात निघून बोरघाटात अपघातांचे प्रमाणही कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट ही लांबी सहा पदरी असून, सहा पदरी मार्गाची वाहतूक या मार्गावरून जात असल्याने प्रचंड वाहतूक वर्दळ व दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. ती या मार्गामुळे दूर होणार आहे. खोपोली एक्झीट ते सिंहगड संस्था हे अंतर १८ कि.मी.चे आहे. अपूर्ण राहिलेली मार्गीका पूर्ण झाल्यानंतर हे अंतर २२ कि.मी. होणार असून, ६ कि.मी.चा अंतराचा फेरा यामुळे कमी होणार आहे.

आठ किमीचे दोन समान बोगदे प्रथमच भारतात
या नवीन रस्त्याच्या निर्मितीमुळे ८ कि.मी. लांबीचे प्रत्येकी चार पदरी असे २ समान बोगदे प्रथम भारतात होणार आहेत. २०० मीटर उंचीचे व प्रत्येकी ८०० मीटर लांबीचे दोन पूलही या प्रकल्पात समाविष्ट आहेत, असेही शिंदे यांनी माहिती देताना सांगितले. या रस्त्याच्या कामासाठी ५ हजार १७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होणार होणार नसून पर्यावरण विभागानेही या कामाला परवानगी दिली आहे.

‘प्रीस्ट्रेस’ सुरक्षा
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्याकरिता खालापूर टोलनाका ते सिंहगड इन्स्टिट्यूट यादरम्यान नवा बोगदा उभारण्यात येणार असून, संपूर्ण ९५ कि.मी. अंतरात प्रीस्ट्रेस केबल बसवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रमासह) एकनाथ शिंदे यांनी दिली. एक्स्प्रेस-वेवरील भरधाव मोटारी दुभाजकावर आदळून होणारे अपघात टाळण्याकरिता सध्या १५ कि.मी.च्या परिसरात प्रीस्ट्रेस केबल बसवल्या आहेत. भरधाव मोटार या केबलवर आदळली तरी अपघात होत नाही. हीच केबल एक्सप्रेस-वेच्या ९५ कि.मी. परिसरात बसवण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारी क्वीक रिस्पॉन्स टीम आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांवरील उपचाराकरिता ट्रॉमाकेअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. रात्री-अपरात्री ट्रकची वाहतूक करणाऱ्या चालक व वाहकांकरिता दर १० कि.मी. अंतरात विश्रांती कक्ष व सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लेनकटिंग करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याकरिता अत्याधुनिक देखरेख यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

Web Title: Express-way fourteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.