‘प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नव्हे’

By admin | Published: November 12, 2016 03:27 AM2016-11-12T03:27:02+5:302016-11-12T03:27:02+5:30

एखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्याचे जाहीर करणे किंवा त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे, असा आग्रह धरणे ही कृती लैंगिक उद्देश असल्याशिवाय लैंगिक छळाच्या व्याख्येत मोडत नाही

'Expressing Love Is Not Sexual Harassment' | ‘प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नव्हे’

‘प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नव्हे’

Next

राकेश घानोडे, नागपूर
एखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्याचे जाहीर करणे किंवा त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे, असा आग्रह धरणे ही कृती लैंगिक उद्देश असल्याशिवाय लैंगिक छळाच्या व्याख्येत मोडत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
एका प्रकरणात संशयिताला सत्र न्यायालयामध्ये लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम-२०१२मधील कलम १२ (लैंगिक छळ) अंतर्गत दोषी धरण्यात आले होते. या कायद्यातील कलम ११मध्ये लैंगिक छळाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. उच्च न्यायालयाने ही तरतूद लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. या तरतुदीनुसार लैंगिक उद्देशाने केलेली कृती लैंगिक छळामध्ये मोडते.
उच्च न्यायालयाने निर्णयामध्ये लैंगिक उद्देशासंदर्भात ऊहापोह केला आहे. उद्देश ही मनाची एक अवस्था आहे. दुसऱ्याच्या डोक्यात शिरून तो काय विचार करीत आहे, हे समजून घेता येत नाही. परंतु, घटनेच्या वेळी असलेली परिस्थिती व प्रकरणातील तथ्यांच्या आधारावर उद्देशाचा अंदाज बांधता येतो. शब्द, हालचाल, हातवारे, प्रतिक्रिया व इतर शारीरिक प्रगटीकरणावरून संबंधित व्यक्तीच्या मनातील विचारांचे आकलन केले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


असे आहे प्रकरण
बंडू विठ्ठल बोरवार (२२) असे आरोपीचे नाव असून, तो मोर्शी येथील रहिवासी आहे. ३० आॅगस्ट २०१३ रोजी शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून ‘तू माझ्यावर प्रेम का करीत नाही,’ अशी विचारणा केली. या प्रकरणी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

Web Title: 'Expressing Love Is Not Sexual Harassment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.