शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 11:06 PM2017-07-31T23:06:51+5:302017-07-31T23:24:16+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Extension of adoption of Peugeot application | शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ

Next

मुंबई, दि. 31 - प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31जुलै 2017 पर्यंत होती, परंतु बरेच शेतकऱ्यांचे बरेच अर्ज जमा करायचे राहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्ट पर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील.
मुदतवाढ देतांना csc ( जनसुविधा केंद्र ) येथे अर्ज स्विकारले जाणार नाही. बँकेतच अर्ज सिकारले जातील. बँकांना मुदतवाढीबाबत इ मेल द्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीयस्तरावर जिल्हाधिकाऱ्या मार्फत सूचित करण्यात येत आहे. असे राज्याचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले आहे.शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे आवाहन  फुंडकर यांनी केले आहे.

Web Title: Extension of adoption of Peugeot application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.