मंत्रीमंडळ विस्तार : उद्धव ठाकरेंचा रावते, कदम, सावंतांना डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 01:07 PM2019-12-30T13:07:08+5:302019-12-30T13:09:13+5:30
युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज निश्चित झाला. कोणत्या नेत्याला कुठल मंत्रीपद हे निश्चित झालं नसल तरी यात अनेक नेत्यांना डावलण्यात आले आहे. शिवसेनेकडून दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत आणि दीपक केसरकरांना डच्चू देण्यात आला आहे.
युतीच्या काळात मंत्री राहिलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार असं सांगण्यात येत होते. मात्र शिवसेनेकडून अनेक नेत्यांना डावलण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर दीपक केसरकर राज्यमंत्री होते.
शिवसेनेने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना देखील आपल्या कोट्यातून मंत्रीपद दिले आहे.
दरम्यान युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही.