सीईटीच्या अर्जासाठी मुदतवाढ
By admin | Published: March 22, 2017 02:38 AM2017-03-22T02:38:51+5:302017-03-22T02:38:51+5:30
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एम.एम.टी. - सीईटी २०१७ या परीक्षेच्या अर्जासाठी असलेल्या मुदतीत वाढ
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एम.एम.टी. - सीईटी २०१७ या परीक्षेच्या अर्जासाठी असलेल्या मुदतीत वाढ करून २३ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. याआधी २३ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी विलंबित शुल्क भरावे लागणार होते.
२३ मार्चपर्यंत अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ३० मार्चपर्यंत विलंब शुल्कासह वाढ देण्यात आली आहे. ५०० रुपये विलंब शुल्क भरून ँ३३स्र://६६६.३िीेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/ेँ३ूी३2017 या संकेतस्थळावर अर्ज भरू शकणार आहेत. २४ एप्रिल ते ११ मे दरम्यान विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. तर परीक्षा ११ मे रोजी होणार आहे. एम.एच.टी. - सीईटी ही प्रवेश परीक्षा अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)