आयडॉल प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Published: September 19, 2016 05:45 AM2016-09-19T05:45:02+5:302016-09-19T05:45:02+5:30

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

Extension up to Idol access till Sep 30 | आयडॉल प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

आयडॉल प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next


मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. सीए अभ्यासक्रमासाठी २२ सप्टेंबर तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
मुंबई विद्यापीठाचे आयडॉल प्रवेश आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले. आतापर्यंत ६२ हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले आहेत. परंतु बी.ए., बीकॉम, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स, नॉटीकल टेक्नॉलॉजी), एम.ए., एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.कॉम. अकाउंट्स/व्यवस्थापन, एम.ए. / एम.एससी. गणित, एमएससी माहिती तंत्रज्ञान, एमएससी संगणक शास्त्र, पीजी डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट, पीजी डिप्लोमा इन आॅपरेशन्स रिसर्च मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी अजूनही प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.
यातील एमसीए प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार असून, ठाणे आणि रत्नागिरी उपकेंद्रावरही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. (प्रतिनिधी)

Web Title: Extension up to Idol access till Sep 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.