‘मैत्रेय’च्या संचालकांच्या जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ

By admin | Published: June 20, 2016 10:12 PM2016-06-20T22:12:54+5:302016-06-20T22:12:54+5:30

गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणखीण ३ कोटी रुपये इस्क्रो खात्यात

The extension of 'Maitreya' directors till July 2 | ‘मैत्रेय’च्या संचालकांच्या जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ

‘मैत्रेय’च्या संचालकांच्या जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २० - गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणखीण ३ कोटी रुपये इस्क्रो खात्यात जमा केले असून न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी या दोघांच्याही जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे़. दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल न केलेले एजंट व महिला गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी करून सत्पाळकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला़. मात्र, महिलांचा रोष पाहाता पोलिसांनी सत्पाळकरांना दुसऱ्या दरवाज्याने न्यायालयाबाहेर काढले़. 
गुंतवणुकीची मुदत पूर्ण होऊनही आर्थिक परतावा न दिल्याने मैत्रेय कंपनीचे संचालक सत्पाळकर व परुळेकर या दोघांविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे़. न्यायालयाने या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करून बँकेत संयुक्त खाते इस्क्रोमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत़. त्यानुसार मागील सुनावणीच्या वेळी कंपनीने या खात्यात अडीच कोटी रुनये जमा केले होते़ दरम्यान पोलिसांकडील तक्रारदारांमध्ये वाढ होऊन फसवणुकीची रक्कम सहा कोटींपर्यंत पोहोचली आहे़. 
मैत्रेयने तक्रारदारांच्या परताव्याच्या रकमेनुसार इस्क्रो खात्यात पैसे जमा करावे यासाठी पोलिसांनी प्रयत्नशील होते़. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार १९ जूनपर्यंत अधिकाधिक रक्कम पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते़. यानुसार कंपनीने सोमवारी (दि़२०) ३ कोटी रुपयांचा भरणा केल्याने या खात्यात आतापर्यंत ५ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे़ मैत्रेयने ही रक्कम इस्क्रो खात्यात जमा केली नसती तर न्यायालयाने या दोघांचेही जामीन रद्द केले असते़. (प्रतिनिधी)

सत्पाळकर मागच्या दरवाज्याने बाहेर
मैत्रेयच्या संचालकांनी दिलेल्या आश्वासनावर पोलिसांत तक्रार दाखल न केलेल्या महिला व पुरुष गुंतवणूकदारांनी वर्षा सत्पाळकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी न्यायालयात गर्दी केली होती़. मात्र, पोलिसांनी गुंतवणूकदारांचा रोष पाहाता वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करून सत्पाळकरांना न्यायालयात हजर केले़. यानंतर गुंतवणूकदारांनी सत्पाळकरांशी बोलण्याबाबत विचारणा केली असता पोलिसांनी ते फेटाळून लावली़ तसेच सुनावणीनंतर दुसऱ्या दरवाजाने बाहेर काढले़. 

मैत्रेयवर अजुनही विश्वास़
मैत्रेयकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ़सीताराम कोल्हे यांनी केले होते़. मात्र तरीही सत्पाळकरांवर विश्वास असलेल्या बहुतांशी एजंटांनी आपल्या गुंतवणूकदारांना तक्रार करण्यापासून रोखले होते़. त्यातच सांचालकांनी केवळ तक्रारदारांचेच पैसे परत करण्याबाबत बांधील असल्याचे न्यायालयात सांगितल्याने तक्रार न केलेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी केली होती़ तसेच केवळ एक मिनिट बोलू द्या अशी विनंती पोलिसांकडे केली मात्र, ती फेटाळण्यात आली़.

 

Web Title: The extension of 'Maitreya' directors till July 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.