एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:38 AM2024-08-24T06:38:24+5:302024-08-24T06:40:01+5:30
३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीची मुदत आता एक दिवसाने वाढवत शनिवारी केली आहे. यापूर्वी ही मुदत शुक्रवारपर्यंत निश्चित करण्यात आली होती.
सीईटी सेलने एमबीबीएससह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांसाठी १७ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली. सेलने सुरुवातीला प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले नव्हते. मात्र, आता ते वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे.
त्यात एमबीबीएस आणि बीडीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी २६ ऑगस्टला जाहीर होणार असून ३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतरच विद्यार्थी कॅप फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक
नोंदणी व कागदपत्रे सादर करण्याची मुदत २४ ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्धी २६ ऑगस्ट
जागांची माहिती २७ ऑगस्ट
कॉलेजचा पर्याय देणे २७ ते २९ ऑगस्ट
पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट
कॉलेज प्रवेश ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर