पोलीस भरती आॅनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

By admin | Published: February 20, 2016 03:19 AM2016-02-20T03:19:14+5:302016-02-20T03:19:14+5:30

महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. विविध घटकांत भरतीसाठी आॅनलाइन अर्ज

Extension for Police Recruitment Online application | पोलीस भरती आॅनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

पोलीस भरती आॅनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

Next

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. विविध घटकांत भरतीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इच्छुकांना आता चार मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या भरतीसाठी राज्यभरातून इच्छुकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांना संधी मिळण्यासाठी आणखी मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलीस दलातील विविध घटकांमध्ये २०१५-१६ साठी सुमारे साडेतीन हजार पदांची भरती करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक १,२००वर पदे मुंबई पोलीस दलातील आहेत. भरतीसाठी एक फेबु्रवारीपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, सुरुवातीला त्यासाठी १८ फेबु्रवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र अधिकाधिक गरजू उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रवेश अर्ज मुदतीत वाढ करावी, अशी सूचना गृह विभागाकडून करण्यात आली. त्यानुसार १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Extension for Police Recruitment Online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.