नागपूर विमानतळाचा खासगीकरणातून विस्तार

By admin | Published: March 11, 2016 04:23 AM2016-03-11T04:23:23+5:302016-03-11T04:23:23+5:30

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार खासगीकरणातून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च येणार असून आंतरराष्ट्रीय

Extension from private Nagpur airport | नागपूर विमानतळाचा खासगीकरणातून विस्तार

नागपूर विमानतळाचा खासगीकरणातून विस्तार

Next

 यदु जोशी,  मुंबई
नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार खासगीकरणातून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च येणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफक्यू) मागविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. 
सूत्रांनी सांगितले की, या विस्तारांतर्गत दुसरा रन-वे, टर्मिनल बिल्डिंग, टॅक्सी वे आदींची उभारणी करण्यात येणार आहे. संपूर्ण उभारणी करून देणे, विमानतळाचे विशिष्ट कालावधीपर्यंत संचालन करून नंतर हस्तांतरण करणे, आलेल्या उत्पन्नातून विशिष्ट वाटा मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) देणे असे स्वरुप असेल. 
नागपूरचा विमानतळ हा केंद्रीय विमानतळ प्राधिकरण आणि एमएडीसीची संयुक्त कंपनी असलेल्या एमआयएलकडे आहे. 
रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये समोर आलेल्या कंपन्यांच्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर कोणत्या नामवंत कंपन्या या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत हे स्पष्ट होईल. आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचा मार्गही मोकळा होईल. 
आंतरजिल्हा वाहतूक
मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात आंतरजिल्हा विमान वाहतूक सुरू करण्याच्या एमएडीसीच्या प्रस्तावास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कमी आसन क्षमता असलेल्या विमानांद्वारे ही वाहतूक केली जाईल. ५०० एकरात उभारणार
कृषी-वन प्रक्रिया झोन
नागपूरच्या मिहान प्रकल्पात ५०० एकरामध्ये कृषी-वन प्रक्रिया झोनची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या उद्योगांना विदर्भातील शेतकऱ्यांकडून १०० कोटी रुपयांचा शेतमाल दरवर्षी खरेदी करण्याची सक्ती असेल. किमान १० हजार शेतकऱ्यांशी एकावेळी करार करावे लागतील. तसे करार त्यांना करावे लागतील. मंजुरीनंतर सहा महिन्यांत उद्योगाची उभारणी सुरू करावी लागेल आणि १८ महिन्यांत ती पूर्ण करावी लागेल. नाहीतर, १० कोटी रुपयांची सुरक्षा ठेव सरकारजमा होईल. कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी दरवर्षी १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. नवीन विमानतळासाठी इन्स्पेक्शन लवकरच
पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यासाठी सध्याच्या विमानतळाजवळ जागा शोधण्यात आली आहे. या जागेची पाहणी करून केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने अहवाल द्यावा यासाठी त्यांच्याकडे एमएडीसीकडून लवकरच शुल्क भरण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. 
अमरावती, धुळे विमानतळाचा विकास
अमरावती येथील विमानतळाची धावपट्टी पूर्णपणे नव्याने बांधण्यास परवानगी देण्यात आली. हे काम करण्यास विमानतळ प्राधिकरणाने असमर्थता दर्शविली आहे. आता ते एमएडीसीमार्फतच केले जाईल. धुळे विमानतळाची दुरुस्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली.

Web Title: Extension from private Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.