कोकण मंडळाची कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

By admin | Published: May 19, 2016 05:59 AM2016-05-19T05:59:28+5:302016-05-19T05:59:28+5:30

२४ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

Extension of submission of documents of Konkan Board | कोकण मंडळाची कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

कोकण मंडळाची कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

Next


मुंबई : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) २४ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विरार-बोळींज, मीरा रोड, कावेसर-ठाणे व वेंगुर्ला-सिंधुदुर्ग येथील ४ हजार २७५ सदनिकांची सोडत काढली होती. ज्या विजेत्या अर्जदारांना सूचनापत्रे मिळालेली नाहीत, त्यांनी वांद्रे पूर्वेकडील गृहनिर्माण भवनात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण मंडळाच्या खोली क्रमांक २५४ किंवा २५५ येथील पणन कक्षात मिळकत व्यवस्थापक २, ३, ४ (पणन) यांच्यामार्फत विजेत्यांना अधिक माहिती देण्यात येईल, असेही कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी सांगितले.

Web Title: Extension of submission of documents of Konkan Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.