पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी

By admin | Published: March 5, 2017 04:43 AM2017-03-05T04:43:27+5:302017-03-05T04:43:27+5:30

मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी

Extensive water in Western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी

पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी

Next

पुणे : मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी टंचाईच्या झळा पुणेकरांना बसणार नाहीत. तसेच जिल्ह्यातील उजनी धरणासह, कोयना, राधानगरी, वारणा, धोम या प्रमुख धरणातील पाणी पातळी देखील सरासरी ५० टक्के असल्याने पश्चिम महाराष्ट्राला एप्रिल-मे महिन्यात पाणीबाणी जाणवणार नाही.
चांगल्या मॉन्सूनमुळे भिमा खोऱ्याबरोबरच कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांत निम्मा पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या डिंभे धरणात ६.१९ टीएमसी (४९.५६ टक्के), भामा-आसखेड ४.७९ (६२.४६), चासकमान २.७९ (३६.८९) आणि पवना धरणात ४.७२ टीएमसी (५५.४५) पाणीसाठा आहे. गुंजवणी १.०३ (४७.५६ टक्के), निरा देवधर ४.७२ (४०.२३), भाटघर १०.३४ (४४) आणि वीर धरणात ७.२८ टीएमसी (७७.३८) पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उजनी धरणातही २८.२२ टीएमसी (५२.६७ टक्के) पाणीसाठा आहे.
राज्यासाठी वीज निर्मिती आणि सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या कोयना धरणात तब्बल ४९.९५ टीएमसी (४९.८९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. वारणा धरणात १६.१५ (५८.६८), राधानगरी ३.७२ (४७.८७), दूधगंगा १४.६४ (६१) आणि ऊरमोडी धरणांत ७.८८ टीएमसी (८१.६८) पाणी शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख धरणांत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने, यंदा उन्हाची तीव्रता वाढली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाईची फारशी जाणवणार नसल्याचे चित्र आहे.

- पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणी पुरवठा होता. या धरणांची क्षमता २९ टीएमसी असून, सध्या त्यात १४.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगावमध्ये ५.६३ (४३.९० टक्के), पानशेत ७.३८ (६९.२५) व खडकवासला धरणात १.३२ टीएमसी (६६.८४) पाणीसाठा आहे. गळतीमुळे टेमघर धरणाची दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी तेथील पाणीसाठी ०.०७ टीएमसीपर्यंत (१.७७ टक्के) खाली करण्यात आला आहे. या चारही धरणांत मिळून तब्बल ४९.३५ टक्के पाणीसाठा असल्याने, यंदा शहराला उन्हाळ््यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. गेल्यावर्षी खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांत मिळून केवळ ८.०५ टीएमसी (२७.६१ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.

Web Title: Extensive water in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.