करवाढ नसलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प

By admin | Published: March 1, 2017 02:52 AM2017-03-01T02:52:20+5:302017-03-01T02:52:20+5:30

अंदाजित अंदाजपत्रकामध्ये मागील वर्षाची शिल्लक धरून २७ कोटी ४८ लाख ५१ हजार ९९५ रुपयांची एकूण जमा रक्कम आहे.

Extra-budget comprehensive budget | करवाढ नसलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प

करवाढ नसलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Next


पेण : पेण नगरपरिषदेचा सन २०१७-१८च्या अंदाजित अंदाजपत्रकामध्ये मागील वर्षाची शिल्लक धरून २७ कोटी ४८ लाख ५१ हजार ९९५ रुपयांची एकूण जमा रक्कम आहे. सन २०१७-१८च्या सुधारित अंदाजपत्रक २३ कोटी ५१ लाख ६८ हजार २९६ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात कोणीतीही करवाढ केलेली नसून नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम व अन्य सुविधा, तसेच दलित वस्ती सुधारण्यासाठी दोन्ही घटकांवर प्रत्येक १ आणि २ कोटी रुपयांची तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा असा सर्वसमावेशक, अर्थसंकल्प करण्यावर भर दिला आहे. तर वर्षाखेर १ कोटी ४० लाख ५ हजार ३३८ची शिल्लक राहणार, असे अंर्थसंकल्पात नमूद केले आहे.
याप्रसंगी पालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, विषय समित्यांचे सभापती व सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन व वसुली खर्च ४ कोटी ४६ लाख २४ हजार ५३० रुपये, सार्वजनिक सुरक्षितता अंतर्गत १ कोटी २६ लाख १० हजारांची तरतूद, विशेष बाब म्हणून आरोग्य व सुखसोयी यांच्यावर सर्वाधिक १० कोटी ५६ लाख ३२ हजार ५०७ रुपयांची तरतूद, तर शिक्षणावर २८ लाख ५० हजारांची तरतूद केली आहे. वरील प्रमुख चार घटकांमध्ये पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गटारे, स्मशानभूमी, रस्ते व फायरब्रिगेडसह जलतरणावर खर्चाची तरतूद आहे.
२०१७-१८ विशेष बाबीच्या तरतुदीमध्ये पेणच्या नाट्यगृहाच्या बांधकामावर १ कोटींच्या तरतुदीने तिसरी घंटा यावर्षी वाजणार आहे. तसेच दलित वस्ती सुधारणा अंतर्गत समाज मंदिर उभारणी व इतर सोयी-सुविधांवर १ कोटींची तरतूद केलेली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्टेडियमच्या गॅलरीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख, नगरोत्थान अभियानांतर्गत आगरी समाज हॉल येथील रस्ता नव्याने बनविणे, बांधा-वापरा हस्तांतरित करा तत्त्वावर भाजी मार्केट व पाणीपुरवठा टप्पा क्र. २ योजना पूर्णत्वास नेणे या अत्यावश्यक योजनेचा समावेश विशेष तरतुदीमधील महत्त्वपूर्ण कामे असा करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्यानंतरच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठविण्याचा पालिकेचा मनसुबा आहे. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० लाख अंध-अपंगासाठी १४ लाख व महिला बाल कल्याणसाठी १० लाखांची तरतूद आहे. एकंदर सर्वच घटकांसहित नाट्यगृह पाणीपुरवठा टप्पा क्र. २ व आरोग्य व सुखसोईसाठी साडेदहा कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकलेला नाही म्हणून सर्वसमावेशक अर्थसंकल्पाची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली पाहिजे. (वार्ताहर)
>नगरपरिषदेची तरतूद
४ कोटी ४६ लाख
सामान्य प्रशासन व वसुली
१ कोटी २६ लाख
सार्वजनिक सुरक्षितता
१० कोटी ५६ लाख
आरोग्य व सुखसोयी
२८ लाख ५० हजार
शिक्षण
वरील प्रमुख चार घटकांमध्ये पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गटारे, स्मशानभूमी, रस्ते व फायरब्रिगेडसह जलतरणावर खर्चाची तरतूद आहे.
२०१७-१८ विशेष बाबीच्या तरतुदीमध्ये पेणच्या नाट्यगृहाच्या बांधकामावर १ कोटींच्या तरतुदीने तिसरी घंटा या वर्षी वाजण्याची शक्यता.

Web Title: Extra-budget comprehensive budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.