सवरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

By admin | Published: September 21, 2016 05:53 AM2016-09-21T05:53:40+5:302016-09-21T05:53:40+5:30

राज्यात कुपोषणाने बालकांचे बळी जात असताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत.

Extra from the Cabinet of Survivors | सवरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

सवरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

Next


मुंबई : राज्यात कुपोषणाने बालकांचे बळी जात असताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना स्वत:च्या मतदारसंघात जाण्यास १५ दिवसांचा वेळ का लागावा, अशी विचारणाही केली. आपले मूल गमावलेल्या त्या संतप्त मातेने सवरा यांना दारातून हाकलले तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातूनही हाकलून लावले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. बुधवारी महिला आणि बालकल्याण मंत्री कुपोषणग्रस्त मोखाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत, त्यांच्या दौऱ्याआधी तेथे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, हा दुर्दैवी प्रकार असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. जमावबंदी लावल्यास जनता आपल्या अडचणी, समस्या मंत्र्यांना कशा सांगणार,
असा सवाल त्यांनी उपस्थित
केला. (प्रतिनिधी)

Web Title: Extra from the Cabinet of Survivors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.