बियाण्यासाठी जादा दर; परवाना होणार निलंबित

By admin | Published: June 21, 2016 03:23 AM2016-06-21T03:23:28+5:302016-06-21T03:23:28+5:30

दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते

Extra rate for seed; Suspended will be licensed | बियाण्यासाठी जादा दर; परवाना होणार निलंबित

बियाण्यासाठी जादा दर; परवाना होणार निलंबित

Next

अकोला : दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते जादा दराने बियाणे विक्री करीत असल्याचे ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून सोमवारी उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत, मुजोर विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिला.
अकोल्यातील ‘महाबीज’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने कडधान्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खरीप हंगामातील महाबीजचे तूर, मूग व उडीद बियाणे मागील वर्षीच्या दरानुसार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील महाबीजच्या सर्व विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यानुसार विक्रेत्यांनी मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्री करणे बंधनकारक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बियाणे दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांची बियाणे खरेदी झाली आहे. त्यामुळे बियाण्याच्या फरकाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्याची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर करणे आवश्यक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लावल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Extra rate for seed; Suspended will be licensed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.